Rohit Sharma | Virat Kohli 
क्रीडा

IND vs AFG: रोहित पुन्हा भारताचा T20 कर्णधार, विराटचेही कमबॅक; अफगाणिस्ताविरुद्धच्या मालिकेसाठी संघ जाहीर

India T20I Squad: बीसीसीआयने आगामी अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर केला असून रोहित विराटचे पुनरागमन झाले आहे.

Pranali Kodre

India Squad for T20I Series against Afghanistan, Rohit Sharma - Virat Kohli comeback:

भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात येत्या ११ जानेवारीपासून तीन सामन्यांची टी२० मालिका सुरू होत आहे. या मालिकेसाठी रविवारी (७ जानेवारी) बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. रोहित या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.

भारताच्या टी२० संघात रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे तब्बल वर्षभराने पुनरागमन झाले आहे. रोहित आणि विराट हे दोघेही भारताकडून टी२० वर्ल्डकप २०२२ स्पर्धेतील उपांत्य फेरीत अखेरचे खेळले होते. उपांत्य फेरी नोव्हेंबर २०२२ मध्ये झाली होती. त्यानंतर हे दोघेही भारताकडून टी२० खेळलेले नाही.

गेल्या वर्षभरात हार्दिक पंड्या नियमितपणे भारतीय टी२० संघाचे नेतृत्व करताना दिसला. तसेच सूर्यकुमार यादवने उपकर्णधार पद सांभाळले होते. सध्या हार्दिक आणि सूर्यकुमार हे दोघेही दुखापतग्रस्त आहेत. त्यामुळे त्यांचा अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी विचार करण्यात आलेला नाही.

दरम्यान, या संघात रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, केएल राहुल अशा काही वरिष्ठ खेळाडूंचाही समावेश नाही.

अफगाणिस्तानविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात जितेश शर्मा आणि संजू सॅमसन यांची यष्टीरक्षक म्हणून निवड करण्यात आलेली आहे. तसेच गोलंदाजी फळीत रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, आवेश खान आणि मुकेश कुमार यांच्याबरोबरच अष्टपैलू अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे यांचा संघात समावेश आहे.

फलंदाजी फळीत रोहित-विराटसह शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग यांना संधी देण्यात आली आहे.

असा आहे भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार

अशी आहे मालिका

दरम्यान, भारतीय संघाची ही जूनमध्ये चालू होणाऱ्या टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेपूर्वीची अखेरची टी20 मालिका आहे.

या टी20 मालिकेतील पहिला सामना 11 जानेवारीला मोहालीला होणार आहे, तसेच दुसरा सामना इंदूरला 14 जानेवारीला रंगेल, तर 17 जानेवारीला बंगळुरूला तिसरा टी20 सामना होणार आहे.

भारत विरुद्ध अफगाणिस्तान, टी20 मालिकेचे वेळापत्रक

  • 11 जानेवारी - पहिला टी20 सामना, मोहाली (वेळ - संध्या. 7 वाजता)

  • 14 जानेवारी - दुसरा टी20 सामना, इंदूर (वेळ - संध्या. 7 वाजता)

  • 17 जानेवारी - तिसरा टी20 सामना, बंगळुरू (वेळ - संध्या. 7 वाजता)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT