Washington Sundar  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs NZ, 3rd ODI : वॉशिंग्टन सुंदरचे झुंजार अर्धशतक, भारताचे न्यूझीलंडला 220 धावांचे आव्हान

बुधवारी न्यूझीलंडविरुद्ध होत असेलेल्या तिसऱ्या वनडेत भारताने प्रथम फलंदाजी करताना यजमानांसमोर 220 धावांचे आव्हान ठेवले आहे.

Pranali Kodre

IND vs NZ, 3rd ODI : भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यातील आणि वनडे मालिकेतील अखेरचा सामना बुधवारी होत आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना यजमानांसमोर विजयासाठी 50 षटकात 220 धावांचे आव्हान ठेवले आहे.

ख्राईस्टचर्च येथे होत असलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. भारताकडून शिखर धवन आणि शुभमन गिलने चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र शुभमन 13 धावा करून बाद झाल्यानंतर भारतीय फलंदाजांनी नियमित अंतराने विकेट्स गमावण्यास सुरुवात केली.

दरम्यान, मधल्या षटकांमध्ये श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) डाव सांभाळला. पण, त्याला फारशी साथ कोणाची मिळाली नाही. ऋषत पंत 10 धावांवर आणि सूर्यकुमार यादव 6 धावा करून बाद झाले. तसेच अय्यरही 59 चेंडूत 49 धावा करून बाद झाला. पाठोपाठ दीपक हुडाही 8 धावांवर बाद झाला. त्यामुळे एका क्षणी भारताची अवस्था 6 बाद 149 धावा अशी झाली होती.

पण नंतर 7 व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या वॉशिंग्टन सुंदरने तळातली फलंदाजी सांभाळताना 64 चेंडूत 51 धावा केल्या. भारताकडून त्याच्याच रुपात अखेरची विकेट गेली. त्यामुळे भारताचा डाव 47.3 षटकात 229 धावातच संपुष्टात आला.

न्यूझीलंडकडून ऍडम मिलने आणि डॅरिल मिशेल यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तसेच टीम साऊदीने २ विकेट्स घेतल्या. तसेच लॉकी फर्ग्युसन आणि मिशेल सँटेनर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Snake Attack Video: साप पकडतानाचा थरार कॅमेऱ्यात कैद! सापाने अचानक केला हल्ला, नंतर काय घडलं? अंगावर काटा आणणारा व्हिडिओ पाहा

Love Horoscope: लग्नाचा विचार करताय? वृषभ राशीच्या लव्ह लाईफमध्ये येणार गोडवा, सुरुवातीचे 6 महिने टाळावा 'हा' मोठा निर्णय

"कधीच विराटला बोलावलं नाही, बोलावणारही नाही!", 'Koffee With Karan'मध्ये कोहलीला 'नो एन्ट्री'; करण जोहरचं धक्कादायक विधान

"गोव्यात हे चाललंय काय?", 450 रुपयांच्या टॅक्सी स्कॅममधून सुटलो, पोलिसांनी 500 रुपये घेतले; जर्मन इन्फ्लुएंसरचा Video Viral

7th Pay Commission Goa: सातवा वेतन आयोग लागू करा! गोव्यातील पंचायत कर्मचाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

SCROLL FOR NEXT