Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

Ind vs Pak: T20 विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार, 3 महिन्यांपूर्वी विकली सर्व तिकिटे

T20 विश्वचषक 2022 च्या फायनलची तिकिटेही जवळपास पूर्णपणे विकली गेली आहेत.

दैनिक गोमन्तक

Ind vs Pak: T20 विश्वचषक 2022 या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात खेळवला जाईल. स्पर्धेला 16 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून अंतिम सामना 13 नोव्हेंबरला होणार आहे. T20 विश्वचषकादरम्यान, भारत आणि पाकिस्तान (Ind vs Pak) यांच्यात सामना होणार आहे. याबाबत क्रिकेट चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. भारत-पाक सामन्याच्या तिकिटांसाठी आतापासूनच चढाओढ सुरू झाली आहे. भारत-पाक सामन्याच्या 3 महिने आधी जवळपास सर्व तिकिटे विकली जातात.

फायनलची तिकिटेही विकली गेली

टी-20 विश्वचषक 2022 मध्ये 23 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. हा सामना आतापासून हाऊसफुल्ल झाला आहे. टुरिझम ऑस्ट्रेलिया आणि इतर अनेक ट्रॅव्हल एजंटकडून ही माहिती मिळाली आहे. T20 विश्वचषक 2022 च्या फायनलची तिकिटेही जवळपास पूर्णपणे विकली गेली आहेत.

23 ऑक्टोबर रोजी होणार आहे

T20 विश्वचषक 2022 मध्ये भारत आणि पाकिस्तानचे संघ एकमेकांविरुद्ध पहिला सामना खेळणार आहेत. हा रोमांचक सामना 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळवला जाईल. याआधी आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामनाही होणार आहे. आशिया चषक यावेळी श्रीलंकेत खेळवला जाणार आहे, त्याचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही.

सामान्य तिकिटांची संपूर्ण विक्री

ग्लोबल स्पोर्ट्स ट्रॅव्हल कंपनीच्या मते, 40 टक्के पॅकेजेस भारतात खरेदी करण्यात आली आहेत. याशिवाय उत्तर अमेरिकेत 27 टक्के, ऑस्ट्रेलियात 18 आणि इंग्लंडसह इतर देशांमध्ये 15 टक्के पॅकेजेस खरेदी करण्यात आल्या आहेत. मेलबर्न (Melbourne Cricket Ground) च्या हॉटेल्समध्ये आगाऊ बुकिंग करण्यात आले आहे. भारत-पाक सामन्याची सामान्य तिकिटे विकली गेली आहेत, काही व्हीआयपी तिकिटे अद्याप बाकी आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोवा सरकारला 'सर्वोच्च' दणका; प्रस्तावित व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात विकासकाम करण्यास बंदी, SC ने 2 आठवड्यांत मागितला अहवाल

PM Modi Saudi Arabia Visit: पीएम मोदींच्या जेद्दाह दौऱ्यावर कोट्यवधींचा खर्च; दोन दिवसांच्या हॉटेल बिलाचा आरटीआयमधून खुलासा

'हे काय बोलून गेले गोव्याचे माजी मुख्यमंत्री', भाजपमध्ये लवकरच भूकंप? सोशल मिडियावर रंगली चर्चा तर विरोधक म्हणाले, 'कामत खरं तेच बोलले

Nepal Protest Explained: जाळपोळ, दगडफेक करत नेपाळमध्ये लाखो तरूण रस्त्यावर का उतरलेत? सोशल मीडिया बंदी, भ्रष्टाचार आणि तेथील राजकारण समजून घ्या

Viral Video: मुर्खपणाचा कळस! रीलसाठी थेट रेल्वे रुळावर झोपला, भरधाव वेगात ट्रेन आली अन्…, पठ्ठ्याचा व्हिडिओ पाहून बसेल धक्का

SCROLL FOR NEXT