Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND vs ENG: टीम इंडियाला दुखापतींची चिंता, इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीला 'हा' स्टार गोलंदाज मुकणार?

Mohammad Shami: इंग्लंडविरुद्ध 25 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेआधी भारतीय संघव्यवस्थापनेला खेळाडूंच्या दुखापतीची चिंता सतावत आहे.

Pranali Kodre

India vs England, Test Series:

इंग्लंड क्रिकेट संघ या माहिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात इंग्लंड संघ भारताविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. मात्र, या मालिकेपूर्वी भारताला मोठी चिंता सतावत आहे.

इंग्लंड विरुद्ध भारत संघात 25 जानेवारीपासून कसोटी मालिका सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांना भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी मुकण्याची दाट शक्यता आहे.

वनडे वर्ल्डकप 2023 नंतर शमी क्रिकेट खेळलेला नाही, तो सध्या घोट्याच्या दुखापतीतून सावरण्याचा प्रयत्न करत असून अद्याप त्याने पुन्हा गोलंदाजीला सुरुवात केलेली नाही. त्यामुळे आता कसोटी मालिकेसाठी त्याची उपलब्धता त्याच्या तंदुरुस्तीवर अवलंबून असणार आहे.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार शमीने अद्याप गोलंदाजीला सुरुवात केली नाही, तसेच पुन्हा तंदुरुस्ती मिळवण्यासाठी त्याला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये जावे लागणार आहे. शमीला दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही खेळता आले नव्हते.

दरम्यान, बीसीसीआय शमीला खेळवण्याची घाई करण्याची शक्यता कमी आहे. त्याच्या अनुपस्थितीत वेगवान गोलंदाजीची धूरा मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह सांभाळू शकतात.

सूर्यकुमार आणि हार्दिकही दुखापतग्रस्त

केवळ शमीचीच नाही, तर भारतीय संघव्यवस्थापनेला सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या यांच्या दुखापतीचीही चिंता आहे.

हार्दिकला वर्ल्डकप 2023 खेळत असतानाच घोट्याची दुखापत झाली होती, तर सूर्यकुमार यादवला दक्षिण आफ्रिका दौऱ्यादरम्यान पायाला दुखापत झाली आहे. त्यामुळे हे दोघेही इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेचा भाग असण्याची शक्यता कमी आहे. त्यांना आगामी अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेसाठीही संधी मिळालेली नाही.

भारत विरुद्ध इंग्लंड, कसोटी मालिकेचे वेळापत्रक

  • 25 ते 29 जानेवारी - पहिली कसोटी, मोहाली (वेळ: स. 9.30 वाजता)

  • 2 ते 6 फेब्रुवारी - दुसरी कसोटी, विशाखापट्टणम (वेळ: स. 9.30 वाजता)

  • 15 ते 19 फेब्रुवारी - तिसरी कसोटी, राजकोट (वेळ: स. 9.30 वाजता)

  • 23 ते 27 फेब्रुवारी - चौथी कसोटी, रांची (वेळ: स. 9.30 वाजता)

  • 7 ते 11 मार्च - पाचवी कसोटी, धरमशाला (वेळ: स. 9.30 वाजता)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT