India vs Afghanistan X/ICC
क्रीडा

IND vs AFG: भारतीय गोलंदाज चमकले, अफगाणिस्तान ऑलआऊट! टीम इंडियाला विजयासाठी 173 धावांची गरज

India vs Afghanistan: अफगाणिस्तानने दुसऱ्या टी20 सामन्यात भारतासमोर 173 धावांचे आव्हान ठेवले आहे.

Pranali Kodre

India vs Afghanistan, 2nd T20I match at Indore:

भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात सध्या टी20 मालिका सुरू असून दुसरा सामना रविवारी (14 जानेवारी) होत आहे. इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने भारतासमोर 173 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे अफगाणिस्तान संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. 20 षटकात अफगाणिस्तानने सर्वबाद 172 धावा केल्या. भारतीय गोलंदाजांनी सांघिक कामगिरी केली.

इंदूरचे मैदान फलंदाजीसाठी पोषक समजले जाते, त्याचमुळे अफगाणिस्तानला 172 धावांत रोखण्याने भारतीय गोलंदाजांचं कौतुक होत आहे. दरम्यान असे असले तरी 172 धावा ही अफगाणिस्तानची भारताविरुद्धची आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या अफगाणिस्तानकडून रेहमनुल्लाह गुरबाज आणि कर्णधार इब्राहिम झद्रान यांनी सलामीला फलंदाजी केली. त्यांनी चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न केला, मात्र 9 चेंडूत 14 धावा करणाऱ्या गुरजाबला रबी बिश्नोईने बाद केले.

नंतर गुलबदीन नायबने फटकेबाजी केली, त्याला इब्राहिम साथ देत होता. पण त्यांची 33 धावांची भागीदारी झाली असताना 8 धावांवर इब्राहिमला अक्षर पटेलने त्रिफळाचीत केले. त्यानंतर लगेचच शिवम दुबेने अझमतुल्लाह ओमरझाईला 2 धावांवर त्रिफळाचीत केले.

गुलबदिनला मोहम्मद नबीने साथ देण्याचा प्रयत्न केला. मात्र, नबीला मोठे फटके खेळण्यापासून भारतीय गोलंदाजांनी रोखले होते. अखेर गुलबदिनच अर्धशतकानंतर अक्षर पटेलविरुद्ध खेळताना रोहित शर्माकडे झेल देत बाद झाला. गुबलदिनने 35 चेंडूत 57 धावांची खेळी केली.

नबीचा अडथळा 15 व्या षटकात रवी बिश्नोईने दूर केला. नबीने 18 चेंडूत 14 धावाच केल्या. यानंतरही नजिबुल्लाह झद्रान (23), करिम जनात (20) आणि मुजीब उर रेहमान (21) छोटेखानी पण आक्रमक खेळी करून बाद झाले. त्यामुळे तिमान अफगाणिस्तानला 179 धावांचा टप्पा पार करता आला. अखेरीस फझलहक फारुकी शेवटच्या चेंडूवर धावबाद झाला.

भारताकडून गोलंदाजी करताना अर्शदीपने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तसेच रवी बिश्नोई आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या, तर शिवम दुबेने एक विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

..तांबडया समुद्रातून बेट मागे टाकल्यावर बोट 'सुएझ कालव्या'त शिरली! गोव्यासाठी लढलेल्या वीरांच्या कारावासातल्या भयाण आठवणी

U19 Asia Cup 2025: भारताचा श्रीलंकेला विजयाचा 'धोबीपछाड'; फायनलमध्ये रंगणार भारत-पाक हायव्होल्टेज थरार! VIDEO

Rahu Gemstone: राहुची महादशा अन् गोमेद रत्नाचा चमत्कार! 'या' 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार; जाणून घ्या फायदे आणि महत्त्वाचे नियम

VIDEO: गोव्यात 'स्पा' सेंटरच्या नावाखाली पर्यटकांची लूट! कळंगुट, बागा किनाऱ्यावर ट्रान्सजेंडरचा वावर, महिलेने उघड केला धक्कादायक प्रकार

Jeffrey Epstein Files: जेफ्री एप्सटीन फाइल्सचा धमाका! डोनाल्ड ट्रम्प, बिल गेट्स यांच्यासह बड्या हस्तींचे फोटो व्हायरल; 18 वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला VIDEO

SCROLL FOR NEXT