india Vs Nepal Dainik Gomantak
क्रीडा

Saff Championship: SAF चॅम्पियनशिपमध्ये भारताचा सलग दुसरा विजय, पाकिस्तानपाठोपाठ नेपाळलाही चारली धूळ

Indian Football Team: श्री कांतीरवा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताकडून कर्णधार सुनील छेत्री (61वे मिनिट) आणि महेश सिंग (70वे मिनिट) यांनी दोन गोल केले.

Manish Jadhav

Saff Championship: सुनील छेत्री आणि महेश सिंग यांनी केलेल्या गोलच्या जोरावर भारतीय फुटबॉल संघाने सॅफ चॅम्पियनशिप अ गटातील सामन्यात नेपाळचा 2-0 असा पराभव केला.

श्री कांतीरवा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताकडून कर्णधार सुनील छेत्री (61वे मिनिट) आणि महेश सिंग (70वे मिनिट) यांनी दोन गोल केले.

कुवेतने नेपाळ आणि पाकिस्तानला पराभूत करुन अ गटात अव्वल स्थान पटकावले, तर भारत आणि कुवेतविरुद्धचे दोन्ही सामने गमावल्यानंतर पाकिस्तानने गुणतालिकेत तळाशी आहे.

दरम्यान, श्री कांतीरवा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय संघासाठी कर्णधार सुनील छेत्री (61वे मिनिट) आणि महेश सिंग (70वे मिनिट) यांनी गोल केले. पूर्वार्धात नेपाळने (Nepal) गोल करण्याचा प्रयत्न केला मात्र, गुरप्रीत संधूने क्लीन शीट ठेवली.

या विजयासह भारत सॅफ चॅम्पियनशिपच्या अ गटात दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांचा पुढील सामना मंगळवारी टेबल-टॉपर्स कुवेतशी होईल, जे विशेष निमंत्रणावर चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होत आहेत.

तसेच, कुवेतने शनिवारी आपल्या दुसऱ्या गट सामन्यात पाकिस्तानचा 4-0 असा धुव्वा उडवत SAFF फुटबॉल चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीतील आपले स्थान जवळपास निश्चित केले.

भारताविरुद्धच्या (India) निराशाजनक पराभवानंतर पाकिस्तानला कामगिरीत सुधारणा करण्याची संधी होती, पण कुवेतच्या वर्चस्वापुढे त्याचा टिकाव लागू शकला नाही.

कुवेतचा हा स्पर्धेतील दुसरा विजय ठरला. अ गटातील त्यांच्या पहिल्या सामन्यात कुवेतने नेपाळचा 3-1 असा पराभव केला. पाकिस्तानचा हा सलग दुसरा पराभव असून त्यांना स्पर्धेतून जवळपास बाहेर काढले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT