Team India
Team India Dainik Gomantak
क्रीडा

'Team India'साठी नववर्ष व्यस्त! वर्ल्डकप, आशिया चषक अन् द्विपक्षीय मालिकांची पर्वणी, पाहा टाईमटेबल

Pranali Kodre

Team India: भारतीय पुरुष क्रिकेट संघासाठी 2023 हे संपूर्ण वर्ष व्यस्त राहाणार आहे. या वर्षात भारतीय संघाला अनेक महत्त्वाच्या मालिका आणि स्पर्धा खेळायच्या आहेत. भारतीय संघ या वर्षाच्या तिसऱ्याच दिवशी म्हणजे 3 जानेवारीपासून सामने खेळण्यास सुरुवात करणार आहे.

साल 2023 मध्ये वनडे वर्ल्डकप होणार असल्याने या संपूर्ण वर्षाच मोठ्याप्रमाणात वनडे सामनेही पाहायला मिळणार आहेत. तसेच जर भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहचला, तर हा अंतिम सामनाही यंदाच्या वर्षात भारतीय संघाला खेळण्याची संधी असेल.

विशेष म्हणजे भारताला जानेवारी ते मार्च या तीन महिन्यातच मायदेशात एकूण 6 मालिका आणि 19 सामने खेळायचे आहेत. तसेच वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेचा दौरा करायचा आहे. यावर्षी आयपीएलचा १६ वा हंगामही होणार आहे. तसेच आशिया चषकही खेळवला जाणार आहे.

भारतीय पुरुष क्रिकेटचे संपूर्ण वर्षाचे वेळापत्रक -

भारत विरुद्ध श्रीलंका -

  • आंतरराष्ट्रीय टी20 मालिका

    3 जानेवारी - पहिला टी20 सामना, मुंबई

    5 जानेवारी - दुसरा टी20 सामना, पुणे

    7 जानेवारी - तिसरा टी20 सामना, राजकोट

  • वनडे मालिका

    10 जानेवारी - पहिला वनडे, गुवाहाटी

    12 जानेवारी - दुसरा वनडे, कोलकाता

    15 जानेवारी - तिसरा वनडे, तिरुअनंतपुरम

भारत विरुद्ध न्यूझीलंड

  • वनडे मालिका

    18 जानेवारी - पहिला वनडे, हैदराबाद

    21 जानेवारी - दुसरा वनडे, रायपूर

    24 जानेवारी - तिसरा वनडे, इंदोर

  • आंतरराष्ट्रीय टी२० मालिका

    27 जानेवारी - पहिला टी20 सामना, रांची

    29 जानेवारी - दुसरा टी20 सामना, लखनऊ

    1 फेब्रुवारी - तिसरा टी20 सामना, अहमदाबाद

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

  • कसोटी मालिका (बॉर्डर-गावसकर ट्रॉफी)

    9 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी - पहिली कसोटी, नागपूर

    17 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी - दुसरी कसोटी, दिल्ली

    1 मार्च ते 5 मार्च - तिसरी कसोटी, धरमशाला

    9 मार्च ते 13 मार्च - चौथी कसोटी - अहमदाबाद

  • वनडे मालिका

    17 मार्च - पहिला वनडे, मुंबई

    19 मार्च - दुसरा वनडे, विशाखापट्टणम

    22 मार्च - तिसरा वनडे, चेन्नई

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2023

आयपीएलच्या 16 व्या हंगामाचे वेळापत्रक अद्याप घोषित झालेले नसले तरी मार्च-मे 2023 दरम्यान हा हंगाम होण्याची दाट शक्यता आहे.

जून 2023 - जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना

जर भारतीय संघ अंतिम सामन्यात पोहचला, तर या जून महिन्यात भारतीय संघाला हा सामना खेळावा लागेल.

जुलै/ऑगस्ट 2023: भारताचा वेस्ट इंडिज दौरा

वेस्ट इंडिज दौऱ्यात भारतीय संघ 2 कसोटी, 3 वनडे आणि 3 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळणार आहे. दरम्यान, या दौऱ्याचे अद्याप वेळापत्रक जाहीर झाले नाही.

सप्टेंबर 2023 - आशिया चषक

यावर्षी सप्टेंबरमध्ये आशिया चषक होणार आहे. पण अद्याप या स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर झालेले नाही.

ऑक्टोबर 2023 - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलिया संघ या वर्षात ऑक्टोबरमध्ये दुसऱ्यांदा भारताचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात 3 वनडे सामने होतील. दरम्यान, अद्याप या मालिकेसाठी तारीख आणि ठिकाणांची घोषणा झालेली नाही.

ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023 - वनडे वर्ल्डकप 2023

भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात 13 व्या वनडे वर्ल्डकपचे आयोजन करण्यात येणार आहे.

नोव्हेंबर/डिसेंबर 2023 - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलियाचा संघ नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये 5 टी20 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी पुन्हा भारतात येणार आहे.

डिसेंबर 2023 - भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा

डिसेंबर 2023 महिन्याच्या अखेरीस भारतीय संघाला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जायचे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

Goa Crime News: भागीदारीसाठी गुंतवलेल्या पैशांमध्ये केली अफरातफर; कळंगुट पोलिसांनी सहाजणांविरुद्ध नोंदवला गुन्हा

SCROLL FOR NEXT