Ravindra Jadeja - Axar Patel X/BCCI
क्रीडा

IND vs ENG: जडेजाची शतकाकडे वाटचाल! दुसऱ्या दिवसाखेर टीम इंडियाकडे पावणे दोनशे धावांची आघाडी

India vs England: हैदराबाद कसोटीत दुसऱ्या दिवसाखेर भारताने इंग्लंडविरुद्ध पावणे दोनशे धावांची आघाडी घेतली आहे.

Pranali Kodre

India vs England, 1st Test at Hyderabad, 2nd Day:

भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना हैदराबादमध्ये सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाने शुक्रवारी दुसऱ्या दिवसाखेर पहिल्या डावात 110 षटकात 7 बाद 421 धावा केल्या आहेत. त्यामुळे भारताकडे दिवसाखेर 175 धावांची आघाडी आहे.

दुसऱ्या दिवसाखेर भारताकडून अष्टपैलू रविंद्र जडेजा 81 धावांवर आणि अक्षर पटेल 35 धावांवर नाबाद आहे.

भारतीय संघाने दुसऱ्या दिवशी 24 व्या षटकापासून आणि 1 बाद 119 धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. यावेळी यशस्वी जयस्वालने 76 धावांपासून आणि शुभमन गिलने 14 धावांपासून खेळायला सुरुवात केली.

मात्र दुसऱ्या दिवशी पहिल्याच षटकात जयस्वालला जो रुटने बाद केले. जयस्वाल 74 चेंडूत 10 चौकार आणि 3 षटकार ठोकत 80 धावा करून बाद झाला.

त्यानंतर गिलने केएल राहुलच्या साथीने डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र गिलला स्ट्राईक रोटेट करता येत नव्हती. त्यातच तो 35 व्या षटकात चुकीचा फटका खेळत बेन डकेटकडे झेल देऊन 23 धावांवर बाद झाला.

परंतु, यानंतर श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी डाव पुढे नेताना अर्धशतकी भागीदारी केली. त्यांनी काही चांगले शॉट्सही खेळले. पण चांगल्या सुरुवातीनंतर श्रेयस अय्यर रेहान अहमदविरुद्ध मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. त्याने 35 धावा केल्या.

त्यानंतरही केएल राहुल आणि रविंद्र जडेजाने चांगला खेळ कायम ठेवत 65 धावांची भागीदारी केली. परंतु केएल राहुलला टॉम हार्टलीने 86 धावांवर बाद केले. त्यामुळे भारताला मोठे धक्का बसला होता. पण यष्टीरक्षक फलंदाज केएस भरतने जडेदाला साथ देताना इंग्लंडला फायदा घेऊ दिला नाही.

जडेजा आणि भरत यांच्यातही अर्धशतकी भागीदारी झाल्याने भारताने साडे तीनशे धावांचा टप्पा सहज ओलांडला. भरतला 41 धावांवर जो रुटने पायचीत पकडले. त्यानंतर लेगचच धाव घेताना गोंधळ झाल्याने आर अश्विन 1 धावंवरच धावबाद झाला.

परंतु, यानंतर मात्र अक्षर पटेलने जडेजाची भक्कम साथ दिली आणि इंग्लंडला दिवस संपेपर्यंत यश मिळू दिले नाही. यादरम्यान, जडेजानेही त्याचे अर्धशतक पूर्ण केले. जडेजा आणि अक्षर यांच्यात दिवसाखेरपर्यंत नाबाद 63 धावांची भागीदारी झाली आहे.

इंग्लंडकडून दुसऱ्या दिवसाखेरपर्यंत टॉम हार्टली आणि जो रुट यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. तसेच जॅक लीच आणि रेहान अहमद यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT