इंडिया पुन्हा हॉकीच्या प्रेमात  Dainik Gomantak
क्रीडा

इंडिया पुन्हा हॉकीच्या प्रेमात

ऑलिंपिकच्या इतिहासामध्ये सर्वोच्च कामगिरी नोंदवत भारतीय हॉकी महिला संघाने जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे.

दैनिक गोमन्तक

टोकियो ऑलिंपिक (Tokyo Olympics) क्रीडा स्पर्धा सुरू झाल्यापासून तेथील हॉकी (Hockey)स्टेडियमला पी. आर. श्रीजेशच्या आरोळ्या ऐकण्याची सवय झाली होती, पण ऑलिंपिक हॉकी स्पर्धेतील जर्मनीविरुद्धच्या ब्राँझ पदकाच्या लढतीत तीन सेकंद असताना श्रीजेशने केलेल्या आरोळीची तुलना कोणत्याही आरोळीबरोबर होणार नाही. ते अपेक्षित होते. त्याने भारतीय हॉकीचा ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेतील पदकाचा दुष्काळ संपल्याची दवंडी पिटली होती. (India in love with hockey again)

भारताने 1980 च्या मॉस्को ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदकानंतर प्रथमच हॉकीत पदक जिंकले होते. आता काहींच्या मते ते यश कमकुवत संघांविरुद्ध होते. काहीही असो, गेल्या 40 वर्षांच्या वेदना, भारतीय हॉकीची होणारी थट्टा, हॉकीपटूंची होणारी हेटाळणी, प्रशासकांमधील स्टीक वॉर, संघातील अंतर्गत संघर्ष, वाया घालवलेली गुणवत्ता, या सर्वांचा लोप आता होण्यास सुरुवात झाली आहे, हे सांगणारीच ती आरोळी होती. आतापर्यंत काही वर्षे केवळ क्रीडा रसिकांचे चाबकाचे फटकेच प्रामुख्याने खात असलेल्या हॉकी संघाने देशाची शान उंचावली होती.

भारतीय हॉकी अखेरच्या मिनिटात नांगी टाकते हा इतिहास, पण ही नवी भारतीय हॉकी आहे, हे दाखविण्यास संघ उत्सुक होता. भारतीय हॉकी मुख्य स्पर्धांतही अॅस्ट्रोटर्फवर जिंकू शकते हे अभिमानाने सांगण्याची आणि फिर दिल दो हॉकी को असे आवाहन गौरवाने करण्याची. मध्यंतरी काळात भारतीयांची राष्ट्रीय खेळामधली रूची कमी झाली होती मात्र हॉकीसाठीचे प्रेम भारतीय महिला हॉकी संघाने परत आणले. भारतीयांना राष्ट्रीय खेळाच्या पुन्हा प्रेमात पडायला भाग पाडले. सुरवातीच्या काही सामन्यांमध्ये महिलांना अपयश आले मात्र ऑस्ट्रेलियावर पराभवाची धुळ चारल्यावर भारतीय महिला संघाच्या आत्मविश्वासात भर पडली. त्यांनंतर भारतीय महिला हॉकीमध्ये एक नवसंजिवनी निर्माण झाली.

काही वर्षांच्या मेहनतीचे फळ

भारतीय हॉकीने गेल्या काही वर्षांत कात टाकली होती. प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू केली होती. त्या वाटचालीच्या वेळी मार्गदर्शक असलेल्या मार्गदर्शकांच्या भावना यावेळी भरून आल्या.

दरम्यान आता टोकियो ऑलिंपिकमध्ये हॉकीत भारतीय महिलांनी (Indian women in hockey) पुन्हा एकदा जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करत चांगली फाईट केली. परंतु ग्रेट ब्रिटनने भारताचा 4-3 असा पराभव करत चंदेरी पदकापासून दूर ठेवले आणि भारताचे स्वप्न भंगले. स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाला पदक मिळाले नसले तरी त्यांनी आपली छाप सोडली आहे. भारताच्या चंदेरी पदकावर ग्रेट ब्रिटनने पाणी फिरवत 4-3 असा सामना जिंकत रौप्य पदक पटकावले. ऑलिंपिकच्या इतिहासामध्ये सर्वोच्च कामगिरी नोंदवत भारतीय महिला संघाने जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: कुडतरीत भाजपची शरणागती?

Goa Drug Case: ड्रग्स प्रकरणात गोव्याचा 'बाबा' आणि 'मुन्ना' चर्चेत; हैदराबादेत अटक केलेल्या तस्कराच्या चौकशीत आंतरराज्य नेटवर्कचा गौप्यस्फोट

Pakistan Airstrike Afghanistan: पाकड्यांची अफगाणिस्तानवर पुन्हा एअरस्ट्राइक! कुनार अन् पक्तिका प्रांतावर केला बॉम्बवर्षाव; अनेक जण गंभीर जखमी

Goa Crime: मोखर्ड येथे एकाच घरात दोन बहिणींचे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह; दुर्गंधी आल्यानंतर उघडकीस आला धक्कादायक प्रकार

RBI New FD Rules: 1 ऑक्टोबरपासून बदलणार एफडीचे नियम! सर्व बँकांसाठी आरबीआयचा 'मास्टरस्ट्रोक'; तुमच्या पैशांवर काय होणार परिणाम?

SCROLL FOR NEXT