India Junior Hockey Team Hockey India
क्रीडा

Hockey Jr. World Cup: भारत सेमीफायनलमध्ये दाखल! नेदरलँड्सविरुद्ध कर्णधाराचा विजयी गोल, तर रोहित सामनावीर

India Hockey Team: भारतीय हॉकी संघाने ज्युनियर वर्ल्डकप स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.

Pranali Kodre

India Hockey Team enter into Semis at Men’s Junior World Cup 2023:

मलेशियाला चालू असलेल्या ज्युनियर हॉकी वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारतीय संघाची शानदार कामगिरी कायम सुरू आहे. भारताने या स्पर्धेत मंगळवारी उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात नेदरलँड्सला पराभवाचा धक्का दिला. यासह भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

भारताने नेदरलँड्सविरुद्ध 4-3 असा रोमांचक विजय मिळवला. विशेष म्हणजे तिसऱ्या क्वार्टरपर्यंत भारतीय संघ 3-2 असा पिछाडीवर होता. पण अखेरच्या क्वार्टरमध्ये भारताने पुनरागमन केले आणि विजयही निश्चित केला.

या सामन्यात नेदरलँड्सने शानदार सुरुवात केली होती. पहिल्याच क्वार्टरमध्ये 5 व्या मिनिटाला नेदरलँड्सकडून टीम बोएर्सने पेनल्टी कॉर्नरवर पहिला गोल नोंदवला होता.

त्यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताच्या मजबूत बचावासमोरही पेपिज्न वॅन डर हिडेनने 16 व्या मिनिटाला नेदरलँड्ससाठी पेनल्टी कॉर्नरवरच दुसरा गोल नोंदवत आघाडी आणखी भक्कम केली होती. त्यामुळे पहिला हाफ संपल्यानंतर नेदरलँड्सकडे 2-0 अशी आघाडी होती. मात्र, ही आघाडी त्यांना दुसऱ्या हाफमध्ये टिकवता आली नाही.

दुसऱ्या हाफमध्ये भारताने खेळ उंचावत चांगले पुनरागमन केले. तिसऱ्या क्वार्टरमध्ये उपकर्णधार अरायजीत सिंग हुंडालने दिलेल्या असिस्टवर आदित्य लालागेने सामन्याच्या 34 व्या मिनिटाला भारतासाठी पहिला गोल नोंदवला.

त्यानंतर दोनच मिनिटांनंतर अरायजीतने पेनल्टी स्ट्रोकवर भारतासाठी दुसरा गोल नोंदवत बरोबरी साधली. मात्र, तिसरा क्वार्टर संपण्यासाठी काहीवेळच राहिला असताना 44 व्या मिनिटाला नेदरलँड्सकडून ऑलिव्हर होर्टेनियसने पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. त्यामुळे पुन्हा नेदरलँड्स आघाडीवर गेले. चौथ्या क्वार्टरमध्ये मात्र भारताचे वर्चस्व राहिले.

शेवटचे 10 मिनिटे राहिलेले असताना भारतीय खेळाडूंनी आपला खेळ उंचावला. 52 व्या मिनिटाला सौरभ आनंद कुशवाहाने भारतासाठी तिसरा गोल नोंदवला. त्यामुळे 3-3 अशी बरोबरी झाली होती.

त्यानंतर तीनच मिनिटांचा खेळ राहिलेला असताना 57 व्या मिनिटाला भारताचा कर्णधार उत्तम सिंगने पेनल्टी कॉर्नरवर चौथा गोल नोंदवला. हा गोल भारतासाठी विजयी गोल ठरला. त्यामुळे नेदरलँड्सवर दबाव वाढला.

भारताकडून बचावात रोहितने चमकला. त्याने चौथ्या क्वार्टरमध्ये सलग 6 पेनल्टी कॉर्नर ब्लॉक केले. त्यामुळे तो या सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूही ठरला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

Shubman Gill Double Century: कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावले 'द्विशतक'

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT