India Football Team X/IndianFootball
क्रीडा

AFC Asian Cup: भारताचं आव्हान संपुष्टात! सलग तिसऱ्या सामन्यातही पदरी पराभवच

Pranali Kodre

India Football Team Campaign End After Lose 0-1 To Syria in AFC Asian Cup 2023:

भारतीय फुटबॉल संघ मोठ्या आशेने कतारला होत असलेल्या एएफसी आशियाई कप 2023 स्पर्धेत उतरला होता. मात्र सुनील छेत्रीच्या नेतृत्वातील भारतीय संघाला या स्पर्धेत तिन्ही सामन्यात निराशाच आली आहे.

मंगळवारी (23 जानेवारी) भारतीय संघाला तिसऱ्या आणि अखेरच्या साखळी सामन्यात सिरियाविरुद्ध 0-1 अशा गोल फरकाने पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवासह भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे या स्पर्धेतील तिन्ही सामन्यांत भारतीय संघाकडून एकही गोल करण्यात आला नाही.

भारताचा पहिला सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध झाला होता. तसेच दुसरा सामना उझबेकिस्तानविरुद्ध झाला, तर तिसरा सामना सिरियाविरुद्ध झाला.

या तिन्ही सामन्यात भारताला पराभव स्विकारावा लागल्याने भारतीय संघ ब गटात चौथ्या म्हणजेच शेवटच्या स्थानी राहिले. त्याचमुळे पहिल्या तीन क्रमांकावर राहिलेल्या ऑस्ट्रेलिया, उझबेकिस्तान आणि सिरिया यांनी पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे.

सिरियाविरुद्ध पराभव

दरम्यान, भारताने सिरियाविरुद्ध पहिल्या हाफमध्ये सिरियाला गोल करू दिला नव्हता. त्यामुळे पहिला हाफ गोलशिवायच संपला.

भारताला सामन्याच्या चौथ्याच मिनिटाला गोल करण्याची संधीही होती. नाओरेम महेश सिंगने प्रयत्नही केले, मात्र सिरियाचा गोलकिपर अहमद मदानियाने गोल आडवण्यात यश मिळवले. पहिल्या हाफमध्ये भारताला आणखीही काही गोलच्या संधी होत्या, मात्र सिरियाने भक्कम बचावाचे प्रदर्शन केले.

दुसऱ्या हाफमध्ये सिरियाकडून 76 व्या मिनिटाला ओमर ख्रिबिनने गोल केला आणि संघाला आघाडी मिळवून दिली. ही आघाडी सिरियाने शेवटपर्यंत टिकवून ठेवण्यात यश मिळवले. त्यामुळे भारताला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.

पाचव्यांदा विजेतेपदाचे स्वप्न भंगले

भारताने या स्पर्धेत खेळण्याची ही पाचवीच वेळ आहे. यापूर्वी 1964, 1984, 2011 आणि 2019 साली भारताने ही स्पर्धा खेळली होती. यातील 1964 ची स्पर्धा वगळता भारताचे आव्हान अन्य तिन्ही वेळेला साखळी फेरीतच संपुष्टात आले. 1964 साली भारतीय संघ उपविजेता राहिला होता.

तसेच या स्पर्धेत एकही गोल न करण्याची भारताची ही दुसरीच वेळ आहे. यापूर्वी १९८४ साली भारताने एकही गोल केला नव्हता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT