Team India Equals England's world record  Dainik Gomantak
क्रीडा

India vs Sri Lanka: 'पंड्यासेने'नं मालिका जिंकताच टीम इंडियाची इंग्लंडच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी

श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या टी20 सामन्यातील विजयासह भारताने इंग्लंडच्या एका विश्वविक्रमाशी बरोबरी केली आहे.

Pranali Kodre

India vs Sri Lanka: शनिवारी भारत विरुद्ध श्रीलंका संघात राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर तिसरा टी20 सामना खेळवला गेला. या सामन्यात भारताने कर्णधार हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली 91 धावांनी विजय मिळवला असून मालिकाही 2-1 फरकाने जिंकली. या विजयासह भारताने मोठा विक्रम नावावर केला आहे.

तिसऱ्या टी20 सामन्यातील विजय हा भारताचा श्रीलंकेवरील आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील 19 वा विजय होता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये एकाच प्रतिस्पर्ध्याविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवण्याच्या बाबतीत भारताने इंग्लंडची बरोबरी केली आहे. भारताने श्रीलंकेविरुद्ध 29 टी20 सामने खेळताना 19 विजय मिळवले.

(India Equals England's world record after win against Sri Lanka in 3rd T20I of the series)

इंग्लंडने पाकिस्तानविरुद्ध सुपर ओव्हरमधील एका विजयासह एकूण 19 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांत विजय मिळवला आहे. तसेच या यादीत पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांनी न्यूझीलंडविरुद्ध 29 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांपैकी 18 सामन्यांत विजय मिळवला आहे.

या यादीत चौथ्या क्रमांकावर पुन्हा एकदा भारतीय संघ असून भारताने वेस्ट इंडीज विरुद्ध 17 आंतरराष्ट्रीय टी20 सामने जिंकले आहेत.

भारताचा 12 वा मालिका विजय

भारताने श्रीलंकेविरुद्ध 2-1 ने मालिका जिंकली. हा भारताचा मायदेशातील सलग 12 वा मालिका विजय आहे. भारताने मायदेशात यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2019 साली टी20 मालिकेत अखेरचा पराभव स्विकारला होता.

भारतीय संघाने जिंकला निर्णायक सामना

तिसऱ्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 228 धावा केल्या होत्या. भारताकडून सूर्यकुमार यादवने 112 धावांची शतकी खेळी केली. तर श्रीलंकेकडून दिलशान मदुशंकाने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर 229 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव 16.4 षटकांत सर्वबाद 137 धावांमध्येच संपुष्टात आला. श्रीलंकेकडून कुशल मेंडिस आणि दसून शनका यांनी प्रत्येकी 23 धावा केल्या. तसेच धनंजय डी सिल्वाने 22 धावा केल्या. या तिघांव्यतिरिक्त अन्य कोणालाही 20 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. भारताकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao: कचऱ्यावर प्रक्रियेसाठी सोनसड्यावर उभा राहणार गॅसिफिकेशन प्रकल्‍प; साडेसात कोटी रुपये खर्च, नगरसेवकांकडून स्वागत

Curchorem: कुडचडे रेल्वे स्टेशनलगतच्या शौचालयाची नळजोडणी तोडली, आस्थापनाची 2.75 लाखांची थकबाकी

Trump Tariff Policy: ट्रम्प यांची ‘टॅरिफ’ पॉलिसी फसली! अमेरिकेत वाढली बेरोजगारी, महागाईनेही गाठला नवा उच्चांक

School Discipline: कच्च्या मडक्यांना योग्य वळण देणारी शाळेची शिकवण; विद्यार्थी आणि शिक्षकांची अविस्मरणीय गाथा

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

SCROLL FOR NEXT