Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND vs SL 1st ODI: विराट-रोहितच्या झंझावातापुढे लंका ध्वस्त, पहिल्या वनडेत टीम इंडियाने मारली बाजी

Team India: रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत विजयी सुरुवात केली.

दैनिक गोमन्तक

IND vs SL 1st ODI: रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत विजयी सुरुवात केली. गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर मंगळवारी भारताने 67 धावांनी दणदणीत विजय नोंदवला. विराट कोहली आणि रोहित शर्माच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताने 373/7 अशी मोठी धावसंख्या उभारली.

प्रत्युत्तरात श्रीलंकेचा (Sri Lanka) संघ 42 षटकांत 8 गडी गमावून 306 धावाच करु शकला. कर्णधार दासुन शनाकाने नाबाद शतक ठोकले. भारताकडून उमरान मल्कीने तीन बळी घेतले. मोहम्मद सिराजने दोन बळी घेतले. त्याचवेळी मोहम्मद शमी, यजुवेंद्र चहल (Yajuvendra Chahal) आणि हार्दिक पांड्याने प्रत्येकी एक विकेट घेतली.

दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर अविष्का फर्नांडोने (5) स्वस्तात विकेट गमावली. कुसल मेंडिसचे खातेही उघडले नाही. चारिथ अस्लंका (23) मोठी खेळी खेळू शकला नाही. पथुम निसांका (72) आणि धनंजया डी सिल्वा (47) यांनी चौथ्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी रचून श्रीलंकेचा डाव सावरला. दोघेही बाद झाल्यानंतर दासुन शनाकाने धावा केल्या. त्याने 88 चेंडूत नाबाद 108 धावा केल्या.

तसेच, या खेळीत त्याने 12 चौकार आणि 3 षटकार मारले. शनाकाला कसून राजिताची चांगली साथ लाभली. दोघांनी नवव्या विकेटसाठी 100 धावांची पाटर्नशिप केली. रजिताने 19 चेंडूंत नाबाद 40 धावा केल्या. वनिंदू हसरंगा (16) आणि चमिका करुणारत्ने (14) फलंदाजी करु शकले नाहीत. तर दुनिथ वेललागे शून्यावर बाद झाला.

तत्पूर्वी, नाणेफेक हारुन फलंदाजी स्वीकारल्यानंतर भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी 143 धावांची भागीदारी केली. रोहितने 67 चेंडूत 83 तर गिलने 60 चेंडूत 70 धावा केल्या. दोघेही बाद झाल्यानंतर कोहलीने फटकेबाजी केली. त्याने तिसऱ्या विकेटसाठी श्रेयस अय्यर (24 चेंडूत 28) सोबत 40 धावांची आणि केएल राहुलसोबत चौथ्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारी केली. राहुलने 29 चेंडूत 39 धावा काढल्या.

तसेच, हार्दिक पांड्या (12 चेंडूत 14 धावा) आणि अक्षर पटेल (9 चेंडूत 9) काही विशेष कामगिरीक करु शकले नाहीत. कोहली सातवा खेळाडू म्हणून पॅव्हेलियनमध्ये परतला. कोहलीने 87 चेंडूत 12 चौकार आणि 1 षटकारासह 113 धावा केल्या. मोहम्मद शमी (3*) आणि मोहम्मद सिराज (7*) नाबाद राहिले. श्रीलंकेकडून राजिताने सर्वाधिक तीन बळी घेतले. दिलशान मदुशंका, चमिका करुणारत्ने, दासुन शनाका आणि धनंजय डिसिल्वा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mini Narkasur: दिवाळीची लगबग! 'मिनी नरकासुर' विक्रीसाठी सज्ज; किंमत वाचून थक्क व्हाल

Goa Opinion: ‘गोंयकारांनी’ घरांसाठी सरकारी दयेवर अवलंबून राहावे का?

Diwali In Goa: 'तिखशे फोव, वझ्या’त खाजीचे लाडू, फेणोरी, चुरमो'! गोव्यातील आगळीवेगळी दिवाळी

Ravi Naik: गोव्याच्या राजकारणाला वळण देण्याची हिकमत असलेला नेता 'रवी नाईक'

Diwali 2025: ..पूर्वी सुकलेल्या गवतापासून नरकासूर बनायचा, गुराख्याच्या सेवेसाठी समर्पित केलेला गोडवा पाडवा; गोव्यातील दिवाळी

SCROLL FOR NEXT