Ishaan Kishan and Suryakumar Yadav  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: सूर्या ब्रिगेडने नोंदवला पहिला विजय, ऑस्ट्रेलियाचा 2 गडी राखून पराभव!

IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिला सामना विशाखापट्टणम येथे खेळला गेला.

Manish Jadhav

IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिला सामना विशाखापट्टणम येथे खेळला गेला. विश्वचषक 2023 च्या फायनलनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा पहिला सामना होता, ज्यामध्ये भारताने शानदार विजय मिळवला. भारताने ऑस्ट्रेलियाचा 2 गडी राखून पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

दरम्यान, या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, हा निर्णय योग्य ठरला नाही, कारण जोश इंग्लिसचे शतक आणि स्टीव्ह स्मिथच्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 20 षटके खेळून 3 गडी गमावून 208 धावा केल्या होत्या.

मात्र, टीम इंडियाने (Team India) 19.5 षटकांत आठ विकेट गमावत 209 धावा करत सामना जिंकला. रिंकू सिंहने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला, पण शॉन अॅबॉटचा चेंडू नो-बॉल झाला. अशा स्थितीत रिंकूच्या खात्यात षटकार जमा झाला नाही.

कर्णधार सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांच्यात तिसऱ्या विकेटच्या भागीदारीने भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. या दोघांनी आक्रमक फलंदाजी करत 60 चेंडूत 112 धावांची भागीदारी केली. 209 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने 2.3 षटकात 22 धावांवर 2 गडी गमावले तेव्हा ही भागीदारी झाली.

दुसरीकडे, लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने 2 गडी लवकर गमावले, तरीही ऑस्ट्रेलियाला सामन्यावर ताबा मिळवता आला नाही. संघाला पहिला धक्का पहिल्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर रनआऊटने बसला.

यशस्वी जयस्वालबरोबर मिस कम्युनिकेशन झाल्याने ऋतुराज गायकवाड रनआऊट झाला. त्यानंतर तिसऱ्या षटकात यशस्वी जयस्वाल 21 (8 चेंडू) धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर मॅथ्यू शॉर्टचा बळी ठरली. जयस्वालने आपल्या छोट्या खेळीत 2 चौकार आणि 2 षटकार मारले.

यानंतर सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन (Ishan Kishan) यांनी तिसऱ्या विकेटसाठी 112 (60 चेंडू) धावांची भागीदारी केली, जी 13व्या षटकात ईशान किशनच्या विकेटने मोडली. ईशानला तन्वीर संघाने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

किशनने 39 चेंडूत 2 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 58 धावांची खेळी खेळली. यानंतर 15व्या षटकातील पाचव्या चेंडूवर 12 धावा काढून तिलक वर्मा आऊट झाला. तिलकलाही तन्वीर संघानेच आऊट केले.

टीम इंडियाच्या विकेट्स अशा पडल्या (209/8, 19.5 षटके)

पहिली विकेट: ऋतुराज गायकवाड (0), विकेट- रनआऊट (11/1)

दुसरी विकेट: यशस्वी जयस्वाल (21), विकेट- मॅथ्यू शॉर्ट (22/2)

तिसरी विकेट: ईशान किशन (58), विकेट- तन्वीर संघा (134/3)

चौथी विकेट: तिलक वर्मा (12), विकेट- तनवीर संघा (154/4)

पाचवी विकेट: सूर्यकुमार यादव (80), विकेट- जेसन बेहरेनडॉर्फ (195/5)

सहावी विकेट: अक्षर पटेल (2), विकेट- शॉन अॅबॉट (207/6)

सातवी विकेट: रवी बिश्नोई (0), विकेट- रनआऊट (207/7)

आठवी विकेट: अर्शदीप सिंग (0), विकेट-रनआऊट (208/8)

इंग्लिसने 47 चेंडूत शतक झळकावले

दरम्यान, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघाने विस्फोटक पद्धतीने धावा केल्या होत्या. संघाने 3 गडी गमावून 208 धावा केल्या. जोश इंग्लिसने तुफानी फलंदाजी करत 47 चेंडूत शतक झळकावले होते. या सामन्यात त्याने 50 चेंडूत एकूण 110 धावा केल्या. इंग्लिसने आपल्या खेळीत 8 षटकार आणि 11 चौकार लगावले.

इंग्लिस व्यतिरिक्त स्टीव्ह स्मिथने 41 चेंडूत 52 धावांची खेळी केली. इंग्लिस आणि स्मिथ यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 67 चेंडूत 130 धावांची भागीदारी झाली होती. टीम इंडियासाठी कोणताही गोलंदाज आपली छाप सोडू शकला नाही. प्रत्येकाने खूप धावा केल्या. प्रसिद्ध कृष्णा आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.

ऑस्ट्रेलियन संघाच्या विकेट अशा पडल्या (208/3, 20 षटके)

पहिली विकेट: मॅथ्यू शॉर्ट (13), विकेट- रवी बिश्नोई (31/1)

दुसरी विकेट: स्टीव्ह स्मिथ (52), विकेट- रनआऊट (161/2)

तिसरी विकेट: जोश इंग्लिस (110), विकेट- प्रसिद्ध कृष्णा (180/3)

ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी

ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना 209 धावांचे लक्ष्य राखता आले नाही. तन्वीर संघाने 2 बळी घेतले, मात्र 4 षटकात 47 धावा दिल्या. तर जेसन बेहरेनडॉर्फने चांगली गोलंदाजी करत 1 बळी घेतला आणि 4 षटकात केवळ 25 धावा दिल्या. याशिवाय, मॅथ्यू शॉर्टने 1 षटकात 13 धावा देत 1 बळी घेतला. तर शॉन अॅबॉटलाही 1 बळी घेण्यात यश आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

Viral Video: बर्फाचा डोंगर घेऊन निघाला...! स्कूटी चालकाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून नेटिझन्सही हैराण; तुम्ही पाहिलाय का?

Anant Chaturdashi 2025 Wishes In Marathi: बाप्पा चालले आपल्या गावाला! अनंत चर्तुदशीनिमित्त नातेवाईकांना शेअर करा 'हे' खास WhatsApp Status

बिट्स पिलानीत 20 वर्षीय विद्यार्थ्याने आयुष्य का संपवले? समोर आले कारण Watch Video

Fake IAS Officer: मुख्यमंत्री-राज्यपालांसोबत फोटो, यूपी-बिहार ते गोवापर्यंत पसरले नेटवर्क, कोट्यवधींचा घातला गंडा; बनावट आयएएस अधिकाऱ्याचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT