Kandivali Mumbai Building Fire ANI
क्रीडा

IPL गाजवलेल्या क्रिकेटवर दु:खाचा डोंगर! मुंबईतील इमारतीच्या आगीत गमावला बहीण अन् भाच्याने जीव

Mumbai Fire: सोमवारी मुंबईतील इमारतीला लागलेल्या आगीत भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या बहीण आणि भाच्याने जीव गमावला आहे.

Pranali Kodre

India cricketer Paul Valthaty's sister and Nephew die in Kandivali, Mumbai fire:

सोमवारी मुंबईतील कांदिवली भागात एक दुर्दैवी घटना घडली. कांदिवली भागातील एका रहिवाशी इमारतीला अचानक आग लागली होती. या आगीत भारताचा माजी क्रिकेटपटू पॉल वॉल्थटीची बहिण आणि भाचा यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार कांदिवलीतील विणा संतूर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या आठ मजली इमारतीला आग लागली होती. या इमारतीत वॉल्थटी कुटुंब चौथ्या मजल्यावर राहते.

या इमारतीला आग लागल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांनी आपापला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र या प्रयत्नात पॉल वॉल्थटी याची बहीण ग्लोरी वॉल्थटी आणि तिचा ८ वर्षीय मुलगा जोशुओ जेम्स रॉबर्ट हे आगीत सापडले.

दरम्यान, तिची मुलगी आणि पती यात वचावले आहेत. खरंतर ग्लोरी आणि तिचे कुटुंब स्कॉटलंडला राहाते. परंतु, ती नुकतीच आजारी असलेल्या पालकांना भेटण्यासाठी मुंबईत आली होती.

मुंबई अग्निशामत दलाचे मुख्य अधिकारी रविंदा अंबुलगेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या मजल्यावरील जळत्या दिव्यामुळे ही आग लागल्याचे प्राथमिक अंदाज आहेत. तसेच इमारतीत अग्शिशामक यंत्रणा बसवण्यात आलेली नव्हती.

दरम्यान, असेही समोर आले आहे की या आगीत आणखी तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये वॉल्थटी कुटुंबाच्या दोन मदतनीस राजेश्वरी अधे आणि लक्ष्मी बुरा यांचाही समावेश आहे.

वॉल्थटी खेळलाय आयपीएल

वॉल्थटीबद्दल सांगायचे झाल्यास तो मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळला आहे. तसेच आयपीएलमध्ये तो किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स या संघाकडून आयपीएल खेळला आहे.

त्याने 23 आयपीएल सामने खेळले असून १ शतक आणि २ अर्धशतकांसह ५०५ धावा केल्या आहेत. त्याने २०११ आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध केलेल्या नाबाद १२० धावांच्या खेळीने त्याला प्रसिद्धीच्या झोतात आणले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dabolim Airport: मंत्री गुदिन्‍होंनी 'दाबोळी'बाबत राजनाथ सिंगांना का पत्र लिहिले? सरदेसाईंकडून सरकारवर हल्लाबोल

Gogol Gulistan Masjid: सुन्नी गुलिस्तान मशीद अखेर खुली! पोलीस बंदोबस्त राहणार, कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आवाहन

America Iran Tension: "तुमच्या युद्धनौकांना समुद्रात गाडून टाकू!" ट्रम्प यांच्या आक्रमकतेवर खामेनेईंचा पलटवार; इराणची अमेरिकेला थेट विनाशाची ताकीद

Guru Margi 2026: करिअरमध्ये मोठी झेप अन् व्यवसायात भरभराट, 'या' भाग्यवान राशींसाठी गुरु ठरणार वरदान; स्वप्नपूर्तीचा काळ आला!

OLA CEO Goa Case: ‘ओला’चे सीईओ भाविश अग्रवालना दिलासा! गोवा खंडपीठाक़डून ‘वॉरंट’ला स्थगिती; पुढील सुनावणी 6 मार्च रोजी

SCROLL FOR NEXT