MS Dhoni Dainik Gomantak
क्रीडा

MS Dhoni: 'कॅप्टनकूल'ला सापडेना रांचीकडे जाण्याचा मार्ग..., अखेर चाहताच धावला मदतीला, पाहा Video

Video: धोनीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून यात तो एका चाहत्याला रांचीचा रस्ता विचारताना दिसत आहे.

Pranali Kodre

MS Dhoni seeks navigation help from strangers:

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तरी तो कोणत्या ना कोणत्या कारणाने सातत्याने चर्चेत येत असतो. त्याचे काही व्हिडिओही व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यातून धोनीचा साधेपणाही दिसून येतोय.

चाहत्यांमध्ये थाला म्हणून ओळखला जाणारा धोनी बऱ्याचदा रांचीच्या रस्त्यांवरून त्याच्या बाईकवर, कारमध्ये फिरताना दिसतो. नुकताच त्याचा असाच कारमधून रांचीला जात असतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून तो एका अनोळखी व्यक्तीला रस्ता विचारतानाही दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये दिसते की धोनीचा मित्र कार चालवत असून त्याच्या शेजारी तो बसला आहे. यावेळी तो रस्त्यावर एका व्यक्ती जो त्याचा चाहता असल्याचेही लक्षात येत आहे, त्याला मार्ग विचारत आहे. यावेळी तो चाहता त्याला मार्ग सांगताना ऐकू येत आहे. व्हिडिओत येत असेलल्या आवाजानुसार चाहता धोनीला सांगत आहे की 'एक गोल चक्कर येईल, त्यानंतर तुम्ही रांचीकडे जाल.'

त्यानंतर धोनीने चाहत्याला विचारले की 'कोणता तो दुसऱ्या मुर्तीवाला चक्कार?' त्यानंतर धोनीने चाहत्यांबरोबर काही फोटोही काढले आणि नंतर तो रांचीकडे निघून गेला.

यापूर्वीही धोनीचे काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओमध्ये तो विंटेज कार चालवताना दिसत आहे. दरम्यान, धोनी सोशल मीडियावर फारसा ऍक्टिव्ह नसतो, पण त्याचे चाहते तो दिसल्यानंतर त्याची झलक टिपण्याची संधी सोडत नाहीत. त्यामुळे त्याचे असे विविध व्हिडिओ व्हायरल होत असतात.

धोनीकडे खास बाईक आणि कार कलेक्शन

काही दिवसांपूर्वीच धोनीच्या दोन मजली गॅरेजचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. भारताचा माजी क्रिकेटपटू वेंकटेश प्रसादने रांचीमध्ये गेल्यानंतर धोनीची भेट घेतली होती. यावेळी त्याने त्याच्या गॅरेजलाही भेट दिली. त्यावेळीचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला होता.

या व्हिडिओमधून धोनीच्या अचंबित करणाऱ्या कार आणि बाईक्स कलेक्शनची झलक सर्वांना पाहायला मिळाली होती.

कॅप्टनकूल धोनी

कॅप्टनकूल म्हणून ओळखला जाणारा धोनी भारताचा यशस्वी कर्णधारही असून त्याच्या नेतृत्वात भारताने 2007 टी20 वर्ल्डकप, 2011 वनडे वर्ल्डकप आणि 2013 चॅम्पिटन्स ट्रॉफी अशी तीन आयसीसी विजेतीपदे जिंकली आहेत.

धोनीने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 526 सामने खेळले असून 44.96 च्या सरासरीने 11 शतके आणि 108 अर्धशतकांसह 17266 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने यष्टीरक्षक म्हणून 829 विकेट्स घेतल्या आहेत.

धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो अद्यापही आयपीएलमध्ये खेळत आहे. धोनीने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत 250 सामने खेळले असून 38.79 सरासरीने आणि 135.92 स्ट्राईक रेटने 5082 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 24 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने यष्टीरक्षण करताना 180 विकेट्स (138 झेल आणि 42 यष्टीचीत) घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT