India beats Australia by 6 wickets in 2nd T 20 played in Sydney 
क्रीडा

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या ट्‌वेंटी २० सामन्यात हार्दिक पंड्याचा विजयी तडाखा ; भारत ६ गडी राखून विजयी

गोमन्तक वृत्तसेवा

सिडनी :  अखेरच्या षटकात धावगती उंचावत होती. भारतास ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या ट्‌वेंटी २० मधील विजयासाठी अखेरच्या १२ चेंडूंत २५ धावांची गरज होती. हार्दिक पंड्याने दहा चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकार खेचत भारतास दोन चेंडू राखून विजय मिळवून दिला. पंड्याच्या या हार्दिक कामगिरीमुळे भारताने ट्वेंटी २० मालिकेत विजयी आघाडी घेतली. 


खरे तर १५ चेंडूत ३५ धावांची गरज असताना श्रेयसने एक चौकार आणि एक षटकार खेचत अखेरच्या षटकातील आक्रमणाचा पाया रचला आणि हार्दिकने अखेरच्या षटकात चौदा धावांचे लक्ष्य चार चेंडूत पार करताना हार्दिकने मिडविकेटला दोन षटकार खेचले. हार्दिकच्या अंतिम हल्ल्याचा पाया शिखर धवनच्या धडाकेबाज अर्धशतकाने तसेच नटराजनने ऑस्ट्रेलिया डावात मोक्‍याच्या वेळी धावास वेसण घातल्याने रचला गेला होता.


पॅट कमिन्स, जोश हेझलवूड आणि मिशेल स्टार्क या प्रमुख गोलंदाजांविना खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाची मदार फलंदाजीवर होती. ॲरॉन फिंच आणि डेव्हिड वॉर्नरविना खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियास बदली कर्णधार मॅथ्यू वेडने धडाकेबाज सुरुवात करून दिली. तो बाद झाला एका गैरसमजुतीने. आपला झेल कोहली घेणार, हे समजून त्याने परतण्यास सुरुवात केली. कोहलीने झेल सोडला; पण वेडला धावचीत केले. 
वेड परतल्यावर स्टीव स्मिथला भक्कम साथच लाभली नाही. त्याचे टायमिंगही चांगले नव्हते. शार्दूल ठाकूर, नटराजन तसेच अखेरच्या षटकातील वीस धावांचा अपवाद वगळता युजवेंद्र चहलने ऑस्ट्रेलियास सव्वादोनशेच्या नजीक जाण्यापासून रोखले. 


भारताने सिडनीतच क्रिकेटचे धडे गिरवलेल्या ॲबॉटच्या दोन षटकांत १७ धावा वसूल केल्या. वेडने त्यामुळे त्याच्याकडे गोलंदाजीच दिली नाही. त्याचा फायदा हार्दिकने अखेरच्या षटकात घेतला नसता तरच नवल होते. भारताने यामुळे दौऱ्यात सलग तिसरा विजय (एकदिवसीय मालिकेत तिसरा आणि ट्‌वेंटी २० मध्ये दोन) मिळवला. 
 

असा झाला ऑस्ट्रेलियाचा डाव

  •     ऑस्ट्रेलिया डावात १५ चौकार आणि ७ षटकारांची बरसात
  •     पहिल्या सामन्यातील सामनावीर युजवेंद्र चहलला एकच विकेट. तोच सर्वांत महागडा गोलंदाज
  •     चहलच्या गोलंदाजीवर सर्वाधिक ५ षटकार, तसेच त्याचा एक चेंडू वाईडही
  •     कर्णधार मॅथ्यू वेडचा सुरुवातीपासून हल्ला, त्यानंतर स्मिथची आक्रमकता
  •     ऑस्ट्रेलियाच्या पाच फलंदाजांचा किमान एक षटकार, त्यांचे 
  • शतक ११ षटकांत

असा झाला भारताचा डाव

  •     भारतीय डावात १३ चौकार आणि ९ षटकारांची बरसात
  •     हार्दिक पंड्याची- श्रेयस अय्यर ३.३ षटकांत ४६ धावांची भागीदारी, त्यात श्रेयसचा वाटा केवळ १२ धावांचा; तर हार्दिक १४ चेंडूत ३४
  •     भारताच्या सलामीवीरांची ऑस्ट्रेलियाच्या तोडीस तोड सुरुवात
  •     ऑस्ट्रेलियाच्या फिरकी आणि मध्यमगती गोलंदाजांकडून त्यानंतर भारतीयांवर दडपण
  •     सतराव्या षटकात श्रेयसचा झॅम्पावर हल्ला, अखेरच्या दोन षटकांतील हल्ल्याची पायाभरणी
  •     भारताचा सलग दहाव्या ट्‌वेंटी २० मध्ये विजय
  •     परदेशातील सलग दहावी ट्‌वेंटी २० लढत भारताने जिंकली
  •     यापूर्वी विंडीजमध्ये तीन, न्यूझीलंडमध्ये पाच 
  •  ऑस्ट्रेलियातील ११ ट्वेंटी २० लढतीत भारताचे ७ विजय, तर अन्य देशांचे एकत्रितपणे ३४ सामन्यात ९ विजय. आणि आता ऑस्ट्रेलियात दोन
  •     भारताने ऑस्ट्रेलियातील ट्‌वेंटी २० मधील धावांच्या पाठलागात दुसरा क्रमांक 
  • मिळवला. अव्वल क्रमांक भारतातच 
  • २०१६ मध्ये १९८
  •     भारताकडून सर्वाधिक सातव्यांदा ट्‌वेंटी 
  • २० मध्ये १९० पेक्षा जास्त धावांचा 
  • यशस्वी पाठलाग
  •     भारताचा सिडनीतील तीनही ट्‌वेंटी २० लढतीत विजय, ऑस्ट्रेलियाची सिडनीतील ट्‌वेंटी २० मध्ये केवळ भारताविरुद्ध हार

"रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमरा हे प्रमुख खेळाडू नसतानाही आम्ही विजय मिळवत आहोत, हे जास्त सुखावणारे आहे. आयपीएलमधील अनुभवाचा नक्कीच फायदा होत आहे. कमी अंतरावरील सीमारेषा असूनही धावसंख्या आवाक्‍यात ठेवू शकलो. चेंडू फटकावण्याच्या क्षमतेमुळे चार वर्षांपूर्वी हार्दिक संघात आला होता. आता आगामी चार-पाच वर्षे कोणत्याही परिस्थितीत सामना जिंकून देऊ शकणारा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिले जाईल. हार्दिकने एबी डिव्हिल्यर्सच्या शैलीत मारलेला स्कूप जबरदस्तच होता."
- विराट कोहली, भारतीय कर्णधार

अधिक वाचा :

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT