Shivam Dubey Dainik Gomantak
क्रीडा

IND Vs AFG: पहिल्या T20 सामन्यात टीम इंडिया जिंकली, धोनीच्या पठ्ठ्यानं ठोकली फिफ्टी

India vs Afghanistan 1st T20I: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना मोहालीच्या पीसीए स्टेडियमवर खेळला गेला.

Manish Jadhav

India vs Afghanistan 1st T20I: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना मोहालीच्या पीसीए स्टेडियमवर खेळला गेला. भारतीय संघाने हा सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. शिवम दुबेने संघासाठी दमदार अर्धशतक झळकावले. या मालिकेतील दुसरा सामना 14 जानेवारीला इंदूरमध्ये होणार आहे. मोहालीतील सामन्यात 159 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने 4 गडी गमावून 17.3 षटकात सामना जिंकला. शिवमने निर्णायक खेळी खेळली. त्याने 38 चेंडूत अर्धशतक केले. शिवमने या सामन्यात 40 चेंडूत 60 धावांची खेळी खेळली.

दरम्यान, या सामन्यात अफगाणिस्तान संघाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना 5 गडी गमावून 158 धावा केल्या होत्या. भारताला विजयासाठी 159 धावा करायच्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला पहिल्याच षटकातच मोठा झटका बसला. कर्णधार रोहित शर्मा खाते न उघडता धावबाद झाला. शुभमन गिल 12 चेंडूत 23 धावा करुन बाद झाला. तिलक वर्मा 22 चेंडूत 26 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतला. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

भारतीय संघाच्या विकेट अशा पडल्या

पहिली विकेट: रोहित शर्मा (0), विकेट- रनआउट (0/1)

दुसरी विकेट: शुभमन गिल (23), विकेट- मुजीब (28/2)

तिसरी विकेट: तिलक वर्मा (26), विकेट- उमरझाई (72/3)

चौथी विकेट: जितेश शर्मा (31), विकेट- मुजीब (117/4)

नबी आणि ओमरझाई यांनी अफगाण संघाची धुरा सांभाळली

दरम्यान, या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तान संघाने 5 विकेट गमावत 158 धावा केल्या होत्या. मोहम्मद नबीने संघाकडून सर्वाधिक 42 धावांची खेळी खेळली. तर अजमतुल्ला उमरझाईने 29 धावा केल्या. या सामन्यात नबी आणि ओमरझाई यांनी चौथ्या विकेटसाठी 43 चेंडूत 68 धावांची भागीदारी केली. भारताकडून अक्षर पटेल आणि मुकेश कुमार यांनी 2-2 विकेट घेतल्या. शिवम दुबेने एक विकेट घेतली.

अफगाणिस्तान संघाच्या विकेट अशा पडल्या

पहिली विकेटः रहमानउल्ला गुरबाज (23), विकेट- अक्षर पटेल (50/1)

दुसरी विकेट: इब्राहिम जादरान (25), विकेट- शिवम दुबे (50/2)

तिसरी विकेट: रहमत शाह (3), विकेट- अक्षर पटेल (57/3)

चौथी विकेट: अजमतुल्ला उमरझाई (29), विकेट- मुकेश कुमार (125/4)

पाचवी विकेट: मोहम्मद नबी (42), विकेट- मुकेश कुमार (130/5)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rohit-Virat Retirement: विराट-रोहित एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार? BCCI उपाध्यक्षांचा मोठा खुलासा, म्हणाले, '...गरज नाही'

Mhaje Ghar Yojana: "म्हज्या गोंयकारांक चवथीचें गिफ्ट" मुख्यमंत्र्यांची घोषणा! माझे घर योजनेतून 450 कुटुंबांना मिळणार मालकी हक्क

Modi Express For Ganeshotsav: 'कोकणात' जाऊचो आनंद काय वेगळोच... गणेशोत्सवासाठी 'मोदी एक्सप्रेस' धावली, नितेश राणेंचा रेल्वेत फेरफटका Watch Video

12 कोटी कॅश, 6 कोटींचे दागिने, १ कोटी परकीय चलन आणि अलिशान कार; काँग्रेस आमदाराला अटक, गोव्यात केली होती छापेमारी

फोटो द्या आणि कलात्मक चित्र मिळवा! गोव्यात सुरू झालाय 'मारियो मिरांडा'च्या शैलीत स्वतःचं चित्र बनवून देणारा उपक्रम

SCROLL FOR NEXT