Zakir Naik  Dainik Gomantak
क्रीडा

FIFA World Cup च्या समारंभात मध्ये दिसला फरार झाकीर नाईक, भारताने घेतला आक्षेप

Zakir Naik Qatar World Cup: आखाती देश कतारमध्ये फिफा विश्वचषक 2022 सुरु आहे. FIFA विश्वचषक 2022 पाहण्यासाठी बड्या सेलिब्रेटींसह जगभरातील लोक पोहोचत आहेत.

दैनिक गोमन्तक

FIFA World Cup 2022: आखाती देश कतारमध्ये फिफा विश्वचषक 2022 सुरु आहे. FIFA विश्वचषक 2022 पाहण्यासाठी बड्या सेलिब्रेटींसह जगभरातील लोक पोहोचत आहेत. दरम्यान, फरार झाकीर नाईकही फिफा विश्वचषक 2022 च्या उद्घाटन समारंभासाठी कतारला पोहोचल्याचे वृत्त समोर आले आहे. कतारची राजधानी दोहा येथे तो दिसला. FIFA विश्वचषक 2022 साठी झाकीर नाईकच्या कतारमध्ये आगमन झाल्याबद्दल भारताने नाराजी व्यक्त केली आहे. यासंबंधी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) कतार सरकारला दखल घेण्यासही सांगितले आहे.

MEA ने मोठे वक्तव्य जारी केले

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी एक निवेदन जारी करुन झाकीर नाईकचा मुद्दा कतार (Qatar) सरकारसमोर मांडला आहे. फरार झाकीर नाईकला भारतात आणण्यासाठी सर्व प्रयत्न सुरु आहेत. झाकीर नाईकला भारतात आणून त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणाची मागणी

झाकीर नाईक दोषी असल्याचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले. त्याला फरार घोषित करण्यात आले आहे. मलेशियासमोर (Malaysia) झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणाची मागणी जोर धरु लागली आहे. हा मुद्दा आता कतार सरकारसमोरही मांडण्यात आला आहे. फरार झाकीर नाईकला भारतात आणण्यासाठी आणि त्याला शिक्षा व्हावी यासाठी आवश्यक ती पावले उचलत राहू, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले आहे.

कतार सरकारने स्पष्ट केले

त्याचवेळी, कतार सरकारने झाकीर नाईकचे फिफा विश्वचषक 2022 च्या उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने दोहा येथे येण्याबाबत स्पष्टीकरण जारी केले आहे. झाकीर नाईकला कोणतेही अधिकृत निमंत्रण देण्यात आलेले नाही, असे कतार सरकारचे म्हणणे आहे. कतार सरकारने म्हटले की, 'भारत आणि आमच्या संबंधांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी अशा खोट्या बातम्या इतर देश जाणूनबुजून पसरवत आहेत.'

विशेष म्हणजे, फिफा विश्वचषक 2022 च्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहण्यासाठी भारताचे उपाध्यक्ष जगदीप धनखर हे देखील कतारला पोहोचले होते. मात्र झाकीर नाईक हा त्याच्या वैयक्तिक कामानिमित्त दोहा येथे आला होता, त्याला निमंत्रित करण्यात आले नसल्याचे कतारचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

SCROLL FOR NEXT