Dhruv Jurel - Akash Deep X/BCCI
क्रीडा

IND vs ENG: जुरेलची झुंज अखेर नव्वदीत संपली, टीम इंडिया 307 धावांवर ऑल-आऊट; इंग्लंडकडे आघाडी

India vs England, 4th Test: रांचीमध्ये सुरू असेलल्या कसोटीत भारतीय संघ 307 धावांवर सर्वबाद झाल्याने इंग्लंडला आघाडी मिळाली आहे. इंग्लंडकडून शोएब बशीरने 5 विकेट्स घेतल्या.

Pranali Kodre

India vs England, 4th Test in Ranchi:

भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी मालिकेतील चौथा सामना रांचीमध्ये शुक्रवारपासून (23 फेब्रुवारी) सुरु झाला आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव संपला. भारताने पहिल्या डावात 103.2 षटकात सर्वबाद 307 धावा केल्या. त्यामुळे इंग्लंडला 46 धावांची आघाडी मिळाली.

भारताकडून अखेरची विकेट ध्रुव जुरेलची गेली. तो 90 धावांवर बाद झाला. इंग्लंडकडून शोएब बशीरने 5 विकेट्स घेतल्या.

या सामन्यात भारताने तिसऱ्या दिवशी पहिल्या डावात 74 षटकापासून आणि 7 बाद 219 धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली होती. यावेळी जुरेल 30 धावांवर आणि कुलदीप यादव 17 धावांवर नाबाद होते.

या दोघांनी संयमी खेळ करत पहिला तास जवळपास खेळून काढताना अर्धशतकी भागीदारीही केली. मात्र अखेर त्यांची जोडी जेम्स अँडरसनने 89 व्या षटकात मोडली. त्याने 131 चेंडूत 28 धावा करणाऱ्या कुलदीपला त्रिफळाचीत केले.

त्यानंतर आकाश दीपनेही जुरेलला चांगली साथ दिली होती. जुरेलने नंतर आक्रमक पवित्रा घेतला. त्याने त्याचे पहिले कसोटी अर्धशतकही पूर्ण केले. परंतु, त्याची आणि आकाश दीपची भागीदारी 40 धावांची झालेली असतानाच आकाशला शोएब बशीरने पायचीत करत आपल्या पाच विकेट्स पूर्ण केल्या.

अखेर 104 व्या षटकात जुरेलला टॉम हर्टलीने त्रिफळाचीत करत भारताचा डाव संपवला. जुरेलने 149 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकार ठोकत 90 धावांची खेळी केली. दरम्यान, त्याने 9 व्या आणि 10 व्या क्रमांकाच्या फलंदाजांबरोबर खेळताना केलेल्या भागीदाऱ्या या सामन्यात भारतासाठी महत्त्वाच्या ठरल्या.

दरम्यान, या सामन्यात भारताकडून पहिल्या डावात यशस्वी जयस्वालनेही दुसऱ्या दिवशी 73 धावांची अर्धशतकी खेळी केली होती. तसेच शुभमन गिलने 38 धावा केल्या होत्या. मात्र बाकी कोणाला खास काही करता आले नव्हते.

इंग्लंडकडून शोएब बशीरने दुसऱ्या दिवशी शानदार गोलंदाजी करताना भारताच्या वरच्या आणि मधल्या फळीला मोठे धक्के दिले होते. त्याने इंग्लंडकडून या डावात सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तसेच टॉम हर्टलीने 3 विकेट्स घेतल्या आणि जेम्स अँडरसनने 2 विकेट्स घेतल्या.

तत्पुर्वी इंग्लंडचा पहिला डाव 104.5 षटकात 353 धावांवर संपला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT