KL Rahul X/BCCI
क्रीडा

SA vs IND, 1st Test: केएल राहुलची शतकी झुंज, तर रबाडाच्या 5 विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ऑलआऊट

KL Rahul: सेंच्युरियन कसोटीत भारताचा पहिला डाव दुसऱ्या दिवशी संपुष्टात आला. भारताकडून केएल राहुलने शतकी खेळी केली.

Pranali Kodre

South Africa vs India, 1st Test Match at Centurion:

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघातील कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला मंगळवारी (26 डिसेंबर) सुरुवात झाली. सेंच्युरियनला होत असलेल्या या सामन्यात भारताचा पहिला डाव बुधवारी म्हणजेच सामन्याच्या दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात संपला.

भारतीय संघाने पहिल्या डावात 67.4 षटकात सर्वबाद 245 धावा केल्या. भारताकडून सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलने शतकी खेळी केली. त्याच्याच रुपात भारताने या डावातील अखेरची विकेट गमावली.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. त्यामुळे भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. मात्र, भारताची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. भारताने रोहित शर्मा (5), यशस्वी जयस्वाल (17) आणि शुभमन गिल (2) यांच्या विकेट्स झटपट गमावल्या.

कागिसो रबाडा आणि नांद्रे बर्गर यांनी भारताला सुरुवातीचे धक्के दिले. त्यामुळे एका क्षणी 3 बाद 24 धावा अशी भारताची अवस्था होती.

मात्र, त्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी 68 धावांची भागीदारी करत भारताचा डाव सावरला. पण हे दोघेही चांगल्या सुरुवातीचा फायदा घेऊ शकले नाहीत. या दोघांनाही रबाडाने बाद केले. श्रेयस 31 धावांवर आणि विराट 38 धावांवर बाद झाला.

त्यानंतरही भारताने आर अश्विनची विकेट 8 धावांवर गमावली. पण नंतर शार्दुल ठाकूरने एक बाजू भक्कम सांभाळणाऱ्या केएल राहुलला साथ दिली. त्यांच्यात 43 धावांची भागीदारी झाली. मात्र शार्दुललाही रबाडाने बाद करत त्याच्या 5 विकेट्स पूर्ण केल्या.

पहिल्या दिवसाखेर भारताने 59 षटकात 8 बाद 208 धावा केल्या होत्या. यावेळी केएल राहुल ७० धावांवर खेळत होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सुरुवातीला केएल राहुलला मोहम्मद सिराजने साथ दिली. पण राहुल 95 धावांवर खेळत असताना सिराज 22 चेंडूत 5 धावा करून बाद झाला.

मात्र, यानंतर राहुलने 66 व्या षटकात षटकार मारत शतक पूर्ण केले. पण 68 व्या षटकात राहुलला बर्गरने बाद करत भारताचा डाव संपवला. राहुलने 137 चेंडूत 101 धावांची खेळी केली. या खेळीत 14 चौकार आणि 4 षटकार मारले.

दक्षिण आफ्रिकेकडून या डावात कागिसो रबाडाने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तसेच पदार्पणवीर नांद्र बर्गरने 3 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर मार्को यान्सिन आणि गेराल्ड कोएत्झी यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Smriti Mandhana Century: स्मृती मानधनाचं ऐतिहासिक 'शतक'! सलग दोन वर्षांत अशी कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली महिला क्रिकेटपटू VIDEO

तोंडावर गोळी घातली नंतर वाहनाखाली चिरडले; गुरांच्या तस्करीला विरोध करणाऱ्या 19 वर्षीय विद्यार्थ्यांची निर्घृण हत्या

SBI Bank Robbery: कर्नाटकातील एसबीआय बँकेवर मोठा दरोडा! तीन दरोडेखोरांनी लुटले 21 कोटींचे दागिने आणि रोकड, आरोपी पंढरपूरच्या दिशेने पसार

मोपा विमानतळाबद्दल 'भ्रामक' व्हिडिओ बनवणं पडलं महागात! 'यूट्युबर'ला दिल्लीतून अटक, गोवा पोलिसांची मोठी कारवाई

Mahindra Bolero: महिंद्रा बोलेरो निओचा नवा अवतार लवकरच बाजारात; जाणून घ्या बदललेले डिझाइन, फीचर्स आणि संभाव्य किंमत

SCROLL FOR NEXT