Shakib Al Hasan Dainik Gomantak
क्रीडा

IND vs BAN: केएलच्या एकाकी अर्धशतकानंतरही टीम इंडिया 186 धावांत गारद! शाकिबचा विकेट्सचा 'पंच'

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या वनडेत केएल राहुलच्या अर्धशतकामुळे भारतीय संघाला 150 धावांचा टप्पा पार करचा आला.

Pranali Kodre

बांगलादेश दौऱ्यातील पहिल्या वनडेत भारतीय संघाच्या फलंदाजांना पहिल्याच वनडे सामन्यांत यजमानांविरुद्ध धावा करताना संघर्ष करावा लागला आहे. शेरे बांगला नॅशनल स्टेडियम, ढाका येथे होत असलेल्या पहिल्या वनडेत भारताचा डाव 41.2 षटकांत 186 धावांतच संपुष्टात आला. त्यामुळे बांगलादेशसमोर आता विजयासाठी 187 धावांचे आव्हान आहे.

या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय प्रथम दर्शनी बांगलादेशने योग्य ठरवला. भारताने 11 षटकांच्या आतच पहिल्या तीन विकेट्स गमावल्या होत्या.

पण नंतर केएल राहुलने श्रेयस अय्यर आणि वॉशिंग्टन सुंदरच्या मदतीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, श्रेयस (24) आणि सुंदर (19) दोघेही खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर बाद झाले. केएल आणि श्रेयस यांच्यात 43 धावांची चौथ्या विकेटसाठी भागीदारी झालेली. तसेच केएल आणि सुंदरमध्ये पाचव्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी झाली.

मात्र, या दोन भागीदाऱ्या तुटल्यानंतर भारताने झटपट विकेट्स गमावल्या. पण, एका बाजूने केएल राहुलने 73 धावांची खेळी करत एकाकी झुंज दिली. त्यामुळे भारताला 186 धावांपर्यंत पोहचता आले. त्याच्याव्यतिरिक्त कर्णधार रोहित शर्मा (27) आणि श्रेयस अय्यर (24) यांनाच 20 धावांचा टप्पा पार करता आला. याशिवाय कोणताही भारतीय फलंदाज कमाल दाखवू शकला नाही.

बांगलादेशकडून शाकिब अल हसनने 5 विकेट्स घेतल्या. यामध्ये त्याने विराट कोहली (9) आणि रोहित शर्मा यांना एकाच षटकात बाद केले. तसेच इबादत हुसैनने 4 विकेट्स घेतल्या. तर मेहदी हसनने 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Railway: रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! दसरा-दिवाळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्यांची घोषणा; जाणून घ्या वेळापत्रक

आतिशी भाजपची बाहुली, दारू घोटाळ्यातील नेत्यांना वाचवण्यासाठी त्यांची धडपड सुरुये; गोवा काँग्रेसची बोचरी टीका

Goa Land Scam: 1200 कोटींच्या भूखंड घोटाळ्याचा पर्दाफाश, ईडीची गोवा आणि हैदराबादमध्ये छापेमारी, 72 लाखांसह 7 आलिशान गाड्या जप्त

पोर्तुगीजांनी नष्ट केलेल्या 1,000 मंदिरांच्या स्मरणार्थ स्मारक मंदिर उभारणार; दिवाडी बेटावर गोवा 'कोटीतिर्थ कॉरिडॉर' प्रकल्प राबवणार

Tomato Fever: टोमॅटोसारखे फोड अन् ताप... लहान मुलांमध्ये 'टोमॅटो फिव्हर'ने वाढवली चिंता; जाणून घ्या लक्षणे, कारणे अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT