India at Asian Games Twitter
क्रीडा

Asian Games: भारतासाठी 11 वा दिवस ऐतिहासिक! पहिल्यांदाच पार केला 'इतक्या' पदकांचा आकडा

India at Asian Games: भारतासाठी 19 वी आशियाई क्रीडा स्पर्धा ऐतिहासिक ठरली आहे.

Pranali Kodre

India acheive best performance in Asian Games 2022 surpassing own record of 70 medals in 2018:

चीनमधील होंगझाऊ येथे सध्या 19 वी आशियाई क्रीडा स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत पहिल्या दिवसापासून भारतीय खेळाडूंनी आपली छाप पाडली आहे. दरम्यान, या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी ऐतिहासिक विक्रमही केला आहे.

यंदा भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत 70 पदक जिंकण्याचा आकडा पार केला आहे. 11 व्या दिवसाखेरपर्यंत म्हणजेच बुधवारपर्यंत भारताच्या नावावर 81 पदके आहेत.त्यामुळे यंदाची स्पर्धा भारतासाठी सर्वात यशस्वी स्पर्धा ठरली आहे. भारताची आशियाई क्रीडा स्पर्धेतील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.

यापूर्वी भारताने 2018 मध्ये जकार्ताला झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 70 पदके जिंकली होती. त्यावेळी भारताने 16 सुवर्ण, 23 रौप्य आणि 31 कांस्य पदके जिंकली होती. पण, यावेळी हा विक्रम मागे पडला आहे.

भारताने १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बुधवारपर्यंत जिंकलेल्या 81 पदकांमध्ये 18 सुवर्ण, 31 रौप्य आणि 32 कांस्य पदकांचा समावेश आहे. तसेच भारताचे काही पदके निश्चितही झाली असल्याने पदकांच्या संख्येत वाढ होणार आहे.

भारताने सध्या सुरु असल्या स्पर्धेत सर्वाधिक 29 पदके ऍथलेटिक्स प्रकारात जिंकली आहेत. यात 6 सुवर्ण, 14 रौप्य आणि 9 कांस्य पदकांचा समावेश आहे. तसेच ऍथलेटिक्स पाठोपाठ भारताने नेमबाजीत 22 पदके जिंकली आहेत. यात 7 सुवर्ण पदकांचा समावेश आहे.

याशिवाय भारताला सेलिंग, रोईंग, टेनिस, कुस्ती, वुशू, स्कॅश, घोडेस्वारी, बॉक्सिंग, टेबल टेनिस, गोल्फ, स्केटिंग, क्रिकेट, कॅनोए, तिरंदाजी अशा खेळांमध्येही पदके मिळाली आहेत.

अद्यापही भारताला कबड्डी, हॉकी, बॅडमिंटन अशा खेळांमध्येही पदकांची आशा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Waste Management: कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळा, अन्यथा कारवाईची शक्यता; 385 घटकांवर प्रशासनाची नजर

Morjim School Repair News: महिना उलटूनही शाळेची दुरुस्ती रखडली; अंगणवाडी स्टेजवर, बालहक्क आयोगाची नाराजी

Morjim Beach Safety: मोरजी बीचवर गुरांचे कळप, भटक्या श्वानांचा उपद्रव; पर्यटन हंगामात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न!

Ranji Trophy: गोव्याची फलंदाजी ठरतेय डोकेदुखी; विदर्भाविरुद्ध पराभवांची मालिका खंडित करण्याचे आव्हान

Rohit Sharma Dance Video: 'ले गई, ले गई' गाण्यावर रोहित शर्मानं धरला ठेका! करिश्मा कपूरसोबतचा डान्स व्हिडीओ व्हायरल; हिटमॅन म्हणाला, 'मजा आ गया'

SCROLL FOR NEXT