india ace shuttler pv sindhu claims swiss open 2022 crown after defeating ongbamrungphan in final  Dainik Gomantak
क्रीडा

Swiss Open 2022 : पीव्ही सिंधूने अंतिम फेरीत पटकावले विजेतेपद

विजयासह सिंधूचा थायलंडच्या खेळाडूविरुद्धचा वन-ऑन-वन ​​विक्रम

दैनिक गोमन्तक

पीव्ही सिंधूने अंतिम फेरीत थायलंडच्या बुसानन ओंगबामरांगफानचा पराभव करत स्विस ओपन बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. सिंधूचे हे वर्षातील दुसरे सुपर 300 विजेतेपद आहे. सिंधूने जानेवारीत सय्यद मोदी इंटरनॅशनल स्पर्धा जिंकली आहे.

दुहेरी ऑलिम्पिक (Olympics) पदक विजेत्या भारतीयाने थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफानचा 49 मिनिटांत 21-16, 21-8 असा पराभव केला. या विजयासह सिंधूचा (pv sindhu) थायलंडच्या खेळाडूविरुद्धचा वन-ऑन-वन ​​विक्रम आता 16-1 वर गेला आहे.

दरम्यान, भारतीय बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉयने शनिवारी येथे जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या इंडोनेशियाच्या अँथनी सिनिसुका जिंटिंगवर आव्हानात्मक विजय मिळवत स्विस ओपन सुपर 300 बॅडमिंटन (Badminton) स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. 29 वर्षीय प्रणॉयने एक तास 11 मिनिटे चाललेल्या रोमहर्षक उपांत्य फेरीत जिंटिंगवर 21-19, 19-21, 21-18 असा विजय नोंदवला.

5 वर्षांनी फायनल

2017 मध्ये यूएस ओपन जिंकणारा प्रणॉयचा पाच वर्षांतील पहिला अंतिम सामना आहे. आता त्याचा रविवारी अंतिम फेरीत देशबांधव किदाम्बी श्रीकांत आणि इंडोनेशियाचा जोनाथन क्रिस्टी यांच्यातील उपांत्य फेरीतील विजेत्याशी सामना होईल. जागतिक चॅम्पियनशिपचा रौप्यपदक विजेता श्रीकांतने जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या डेन्मार्कच्या अँडर अँटोन्सेनविरुद्ध तीन गेममध्ये विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI 2025 चा दिमाखदार समारोप! रजनीकांत, रणवीरच्या उपस्थितीने लावले चार चांद, ‘स्किन ऑफ युथ’ला गोल्डन पिकॉक तर संतोष दवखर यांना 'गोंधळ'साठी 'रौप्य मयूर'

Goa Firing: सत्तरीतील पडोसे गावात पुन्हा गोळीबार! एकाला अटक, एअरगन आणि काडतुसे जप्त; वाळपई पोलिसांकडून पुढील तपास सुरु

PM Modi Goa Speech: "आयुष्याच्या प्रत्येक वळणावर गोव्याच्या भूमीने मला दिशा दिली", PM मोदी असं का म्हणाले? Watch Video

Goa Accident: मुळगावात दुचाकींची समोरासमोर धडक, दोन तरुणांचा मृत्यू; अपघाताची पोलिसांकडून चौकशी सुरु

''गोव्याने केवळ संस्कृतीच जपली नाहीतर...'', गोकर्ण पर्तगाळी मठाच्या योगदानाचे कौतुक करताना PM मोदींनी काढले गौरोद्गार VIDEO

SCROLL FOR NEXT