India vs Pakistan 
क्रीडा

World Cup 2023: 12 वर्षे, 5 भारतीय गोलंदाज अन् 2 विकेट्स, IND vs PAK सामन्यात घडला खास योगायोग

India vs Pakistan: भारतीय गोलंदाजांनी शनिवारी पाकिस्तानविरुद्ध केलेल्या कामगिरीने अनेकांना 12 वर्षांपूर्वीचा सामना आठवला.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs Pakistan:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत शनिवारी भारत विरुद्ध पाकिस्तान संघात सामना झाला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने 7 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी सांघिक कामगिरी करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्यामुळे एक खास योगायोग पाहायला मिळाला आहे.

शनिवारी झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानला 42.5 षटकात अवघ्या 191 धावांवर रोखले. भारताकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

विशेष म्हणजे पाकिस्तानविरुद्ध वनडे वर्ल्डकपमध्ये 5 गोलंदाजांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेण्याची ही पहिलीच वेळ नाही.

यापूर्वी 12 वर्षांआधी म्हणजेच 30 मार्च 2011 रोजी वनडे वर्ल्डकपच्या उपांत्य सामन्यात पाच भारतीय गोलंदाजांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या होत्या. त्यावेळी भारताकडून झहीर खान, आशिष नेहरा, मुनाफ पटेल, हरभजन सिंग आणि युवराज सिंग यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

2011 साली झालेल्या वर्ल्डकपच्या उपांत्य सामन्यात भारताने पाकिस्तानसमोर 261 धावांचे आव्हान दिले होते. पण भारतीय गोलंदाजांनी दाखवलेल्या शानदार कामगिरीमुळे पाकिस्तानचा संघ 49.5 षटकात 231 धावांवर सर्वबाद झाला होता.

दरम्यान, शनिवारी झालेल्या सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर भारताने 192 धावांचे आव्हान 30.2 षटकात 3 विकेट्स गमावत पूर्ण केले. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 86 धावांची खेळी केली. तसेच श्रेयस अय्यरने नाबाद 53 धावा केल्या. पाकिस्तानकडून शाहीन शाह आफ्रिदीने 2 विकेट्स घेतल्या आणि हसन अलीने 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT