India Women Team Dainik Gomantak
क्रीडा

IND W Vs PAK W: आशिया कप 2022 मध्ये टीम इंडियाचा पाकिस्तानकडून पराभव

Asia Cup 2022: आशिया चषक 2022 मध्ये भारतीय महिला संघाचा पहिला पराभव झाला आहे.

दैनिक गोमन्तक

IND W vs PAK W, Asia Cup 2022: आशिया चषक 2022 मध्ये भारतीय महिला संघाचा पहिला पराभव झाला आहे. आशिया कप 2022 मध्ये पाकिस्तान आणि टीम इंडिया यांच्यात झालेल्या सामन्यात भारतीय महिला संघाला पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय महिला संघाने यापूर्वी आशिया कप 2022 मध्ये सलग तीन सामने जिंकले आहेत, परंतु या सामन्यात भारतीय फलंदाजी पूर्णपणे फ्लॉप ठरली.

भारतीय फलंदाजी फ्लॉप ठरली

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानच्या (Pakistan) संघाने 20 षटकात 6 गडी गमावून 137 धावा केल्या, प्रत्युत्तरात टीम इंडिया 124 धावांवर ऑलआऊट झाली. टीम इंडियासाठी (Team India) रिचा घोषने सर्वाधिक 26 धावा केल्या, तर दयालन हेमलताने 20 धावा केल्या. या दोन खेळाडूंशिवाय एकाही फलंदाजाला 20 धावांचा पल्ला गाठता आला नाही.

निदा दारने अर्धशतकी खेळी खेळली

निदा दारच्या नाबाद अर्धशतकानंतरही पाकिस्तानी संघ या सामन्यात भारताविरुद्ध (India) सहा बाद 137 धावाच करु शकला. परंतु निदा दारची ही खेळी टीम इंडियावर भारी पडली. तथापि, कट्टर प्रतिस्पर्धी भारताविरुद्ध पाकिस्तानी फलंदाजांची ही सुधारित कामगिरी होती. त्यांना गुरुवारी थायलंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता. निदाने या सामन्यात शानदार प्रदर्शन केले, विशेषत: फिरकीपटूंविरुद्ध. तिने 37 चेंडूंच्या खेळीत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद 56 धावा केल्या. तिच्याशिवाय, पाकिस्तानी संघाची कर्णधार बिस्माह मारुफने 32 धावांचे योगदान दिले. दोघांनीही 58 चेंडूत 76 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली.

दीप्ती शर्माने तीन विकेट घेतल्या

भारतीय गोलंदाजांमध्ये दीप्ती शर्मा सर्वाधिक यशस्वी ठरली, तिने चार षटकांत 27 धावा देत तीन बळी घेतले. दीप्तीने प्रथम पाकिस्तानी सलामीवीर मुनिबा अलीला (17 धावा) यष्टिचित केले. त्यानंतर दोन चेंडूंत ओमेमा सोहिल शून्यावर आऊट झाली. तेव्हा बिस्माही आठ धावांवर भाग्यवान ठरली. पाकिस्तानने 10 षटकांत 3 गडी गमावून 61 धावा केल्या. निदाने डावाला गती देत डी हेमलताच्या चेंडूवर एक चौकार आणि षटकार खेचून 15 धावा केल्या. दीप्तीशिवाय पूजा वस्त्राकरने दोन आणि रेणुका सिंगने एक विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Education: 'UPSC'ची परीक्षा देताय? गोवा विद्यापीठ देणार संपूर्ण प्रशिक्षण; कसं जाणून घ्या एका क्लिकवर!

Goa Live News: गणेश मूर्ती तयार करण्याचे का पुढील ४-५ दिवसांत काम पूर्ण होण्याच्या मार्गावर

Kudchire: भलामोठा, 200 वर्षांचा जुनाट वृक्ष धोक्यात; जोरदार पावसामुळे व्हावटी-कुडचिरे येथे कोसळली दरड

Ponda: बनावट दाखला प्रकरण! नगरसेवकाला जामीन; काँग्रेसची सखोल चौकशीची मागणी

Goa: 'राज्यात घरे कायदेशीर करताना दंडही वसूल करणार', मुख्‍यमंत्र्यांनी दिली माहिती; सहकार्याचे कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT