Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND W vs AUS W: तितासचा भेदक मारा, स्मृती-शफालीची शानदार बॅटिंग; पहिल्या T20 सामन्यात कांगारुंचा दारुण पराभव

IND W vs AUS W 1st T20I: भारतीय महिला संघाने पहिल्या T20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 9 गडी राखून पराभव केला.

Manish Jadhav

IND W vs AUS W 1st T20I: भारतीय महिला संघाने पहिल्या T20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 9 गडी राखून पराभव केला. नवी मुंबईत झालेल्या सामन्यात तीतास साधूच्या 4 विकेट्सच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाचा डाव 19.2 षटकांत 141 धावांत गुंडाळला. प्रत्युत्तरात स्मृती मंदाना आणि शफाली वर्मा यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारतीय महिला संघाने एक विकेट गमावून ऑस्ट्रेलियाचा 9 विकेट राखून पराभव केला. भारताने 17.4 षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात 145 धावा करुन सामना जिंकला.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 142 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शफाली वर्मा आणि स्मृती मंदाना यांनी भारताला चांगली सुरुवात करुन दिली आणि संघाला विजयाच्या जवळ नेले. स्मृतीने 52 चेंडूत 54 धावा केल्या. तर शफालीने 44 चेंडूत 64 धावा केल्यानंतर नाबाद राहिली. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना जिंकून भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

तत्पूर्वी, तितास साधूच्या (17 धावांत चार विकेट) कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरीमुळे भारतीय महिला संघाने शुक्रवारी तीन सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 19.2 षटकांत 141 धावांत गुंडाळले. साधूशिवाय दीप्ती शर्माने 24 धावांत दोन आणि श्रेयंका पाटीलने 19 धावांत दोन बळी घेतले. साधूने सुरुवातीला तीन बळी घेतल्यानंतर, फोबी लिचफिल्ड (49 धावा) आणि एलिस पेरी (37 धावा) यांनी पाचव्या विकेटसाठी 79 धावांची भागीदारी करुन ऑस्ट्रेलियाला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत नेले होते.

दुसरीकडे, साधूने पॉवरप्लेमध्ये पहिल्या स्पेलमध्ये तीन षटकांत आठ धावा देऊन तीन विकेट घेतल्या, बेथ मुनी (17), ताहलिया मॅकग्रा (0) आणि अॅशले गार्डनर (0) यांच्या विकेट घेतल्या. त्याचबरोबर तिने शेवटच्या षटकात (डावाच्या 18व्या) अॅनाबेल सदरलँडच्या (12) रुपाने चौथी विकेट घेतली. एकदिवसीय मालिकेत फलंदाजीत अव्वल स्थान पटकावणाऱ्या लिचफिल्डने टी-20 मध्ये आपला फॉर्म कायम ठेवला पण अर्धशतक हुकले. तिच्या खेळीत तीन षटकार आणि चार चौकारांचा समावेश होता. तिने 32 चेंडूत 49 धावा केल्या होत्या. पेरीने 30 चेंडूंत दोन चौकार आणि तब्बल षटकारांसह 37 धावांचे योगदान दिले.

तसेच, भारताने आपल्या क्षेत्ररक्षणात बरीच सुधारणा केली आणि अनेक धावा रोखल्या. पण 12व्या षटकात लिचफिल्ड 27 धावांवर असताना तिचा झेल सुटला. ती दीप्तीचा चेंडू रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न करत होती, परंतु रेणुका सिंग आणि जेमिमाह रॉड्रिग्स यांच्यातील गोंधळामुळे तिचा झेल सुटला. लिचफिल्ड 15 व्या षटकात अमनजोत कौरचा (23 धावांत 1 बळी) बळी ठरली, जिचा झेल भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने घेतला. हरमनने या सामन्यात चार झेल घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 75 वर्षांच्या आजीबाईचा डान्स फ्लोअरवर तहलका, सोशल मीडियावर जबरदस्त डान्स व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, "वाह आजी क्या बात है!"

WPL Auction 2026: वर्ल्ड कपमध्ये 2 शतके, 299 धावा! विश्वविक्रमी कामगिरी करुनही ऑस्ट्रेलियाची 'ही' स्टार खेळाडू राहिली 'अनसोल्ड'

ZP निवडणूक वेळेवरच! आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या

Goa Politics: आरजी-काँग्रेसचे विचार वेगळे! आमदार व्हेन्झींची युतीवर टीका; म्हणाले, "भाजपला हरवण्यासाठी 'स्वच्छ' नेतृत्वाची गरज"

Mangal Gochar 2026: 16 जानेवारीला मंगळ ग्रहाचे पहिले गोचर! 'या' 3 राशींच्या लोकांवर होणार धनवर्षा; आरोग्य, प्रेम आणि व्यवसायातही मिळणार यश

SCROLL FOR NEXT