zimbabwe Dainik Gomantak
क्रीडा

IND Vs ZIM: भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी झिम्बाब्वेचा संघ जाहीर

IND Vs ZIM: झिम्बाब्वेचा कर्णधार क्रेग एविन, ब्लेसिंग मुजारबानी, तेंडाई चतारा आणि वेलिंग्टन मसाकादझा हे भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी संघात नसतील.

दैनिक गोमन्तक

IND Vs ZIM: झिम्बाब्वेचा कर्णधार क्रेग एविन, ब्लेसिंग मुजारबानी, तेंडाई चतारा आणि वेलिंग्टन मसाकादझा हे भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी संघात नसतील. बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेत संघाचा नेतृत्व करणारा रेगिस चकाब्वा पुन्हा एकदा एविनच्या अनुपस्थितीत कर्णधाराची भूमिका साकारताना दिसणार आहे. 18 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत रेगिस चकाब्वा 17 जणांच्या झिम्बाब्वे संघाचे नेतृत्व करेल.

दरम्यान, एविन हा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे, तर मुजारबानी, चतारा आणि मसाकादझा यांना अनुक्रमे हॅमस्ट्रिंग फ्रॅक्चर, कॉलरबोन फ्रॅक्चर आणि खांद्याच्या दुखापतीमुळे संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. या मालिकेला 18 ऑगस्टपासून सुरुवात होणार असून तिन्ही सामने हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळवले जातील.

मिळालेल्या माहितीनुसार, "कर्णधार क्रेग एविनच्या अनुपस्थितीत चकाब्वा संघाचे नेतृत्व करेल. इर्विन दुखापतीमुळे या मालिकेत खेळू शकणार नाही.” झिम्बाब्वेलाही (Zimbabwe) ब्लेसिंग मुजरबानी, तेंडाई चतारा आणि वेलिंग्टन मसाकादझा यांच्याशिवाय खेळावे लागणार आहे. तिन्ही खेळाडूही दुखापतीतून सावरत आहेत. सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजता सुरु होतील.

झिम्बाब्वे संघ विरुद्ध भारत: बर्ल रयान, चकबवा रेगिस (कप्तान), चिवांगा तनाका, इवांस ब्रैडली, जोंगवे ल्यूक, कैया इनोसेंट, कैटानो ताकुदज़वानाशे, मदांडे क्लाइव, मधेवेरे वेस्ली, मारुमानी तदिवानाशे, मसारा जॉन, मुनयोंगा टोनी, नगारवा रिचर्ड, न्याउची वक्टिर, रजा सिकंदर, शुंभा मल्टिन, तिरिपानो डोनाल्ड

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan ODI Captain: पाकिस्तान क्रिकेट क्षेत्रात खळबळ! रिजवानची केली हकालपट्टी; 'या' आक्रमक गोलंदाजाच्या हाती दिले नेतृत्व

Goa Politics: "आम्हाला कोणी बोलावलंच नाही",फातोर्डा मेळाव्यावर पालेकरांचा खुलासा; 'आप'शिवाय विरोधी पक्षांची एकजूट?

Sancoale Theft: गोव्यात आणखी एक मोठी चोरी, सांकवाळ येथे फ्लॅट फोडला; 8.5 लाखांचे दागिने, महागडी घडयाळे लंपास

Goa Live Updates: पॅथॉलॉजिकल लॅबला आके-बायश येथे विरोध

Majorda: धिरयोत उधळला रेडा, छातीत खुपसले शिंग; माजोर्डा मृत्यूप्रकरणातील संशयित अमेरिकेत, पोलिसांच्या वाढल्या अडचणी

SCROLL FOR NEXT