Ryan Burl Dainik Gomantak
क्रीडा

"मला Yuvraj Singh सारखी फलंदाजी करायची होती", झिम्बाब्वेच्या धाकड फलंदाजाचा खुलासा

T-20 World Cup: टी-20 विश्वचषकासाठी पात्रता मिळवून संघ सहाव्यांदा मेगा स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

दैनिक गोमन्तक

IND vs ZIM: झिम्बाब्वे संघासाठी गेला महिना चांगला गेला आहे. टी-20 विश्वचषकापूर्वी पात्रता फेरीत स्थान मिळवून संघ सहाव्यांदा मेगा स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. झिम्बाब्वेचा संघ 2016 नंतर प्रथमच T20 विश्वचषक खेळणार आहे. संघाने अलीकडेच बांगलादेशचा 2-1 ने पराभव करुन प्रथमच उच्च श्रेणीतील संघाविरुद्ध T20 मालिका जिंकली आहे. याशिवाय बांगलादेशविरुद्धची एकदिवसीय मालिकाही त्यांनी 2-1 अशी जिंकली आहे.

दरम्यान, झिम्बाब्वेच्या (Zimbabwe) अलीकडच्या यशात डावखुरा फलंदाज रायन बर्लचा (Ryan Burl) महत्त्वाचा वाटा आहे. बर्लने हरारे येथे बांगलादेशविरुद्धच्या (Bangladesh) सामन्याच्या 15 व्या षटकात नसुम अहमदच्या चेंडूवर 34 धावा केल्या. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका षटकात दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रमाची त्याने बरोबरी केली. त्याने आपल्या डावात 54 धावा केल्या. बर्ले आता भारताविरुद्ध (India) 18 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत खेळण्यास उत्सुक आहे.

दुसरीकडे, बर्ले यांनी वृत्तसंस्था IANS ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'भारतात असे अनेक क्रिकेटपटू आहेत, ज्यांना पाहत मी मोठा झालो आहे.' बांगलादेशविरुद्धच्या टी-20 सामन्यात युवराज सिंगसारखी (Yuvraj Singh) फलंदाजी करायची होती, असा खुलासाही त्याने केला. 2007 च्या टी-20 विश्वचषकात युवराजने स्टुअर्ट ब्रॉडच्या चेंडूवर इंग्लंडविरुद्ध सलग सहा षटकार ठोकले होते.

“साहजिकच सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), हरभजन सिंग, युवराज सिंग आणि इतर बरेच खेळाडू आहेत. बांगलादेशविरुद्धच्या माझ्या शेवटच्या मालिकेत, डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाविरुद्ध एका षटकात 34 धावा मिळाल्या, तेव्हा मला युवराज सिंगचा विक्रम आठवला, जेव्हा त्याने ब्रॉडच्या एका षटकात सहा षटकार मारले होते. मी त्याच पद्धतीने फलंदाजी करण्याचा प्रयत्न करत होतो,'' असेही त्याने शेवटी म्हटले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Petrol Diesel Prices In Goa: महाराष्ट्र, कर्नाटकपेक्षा गोव्यात पेट्रोल - डिझेल स्वस्त; जाणून घ्या ताजे भाव

Junta House: ‘पणजीतील जुन्‍ता हाऊस 30 दिवसांत रिकामे करा’, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; इमारतीचे होणार नूतनीकरण

Goa News Live: सराईत गुंड 'टारझन' विरोधात हत्यार कायद्याखाली गुन्हा; अड्डयावर सापडली तलवार

DSSY चे 13 हजार बोगस लाभार्थी! समाजकल्याण खात्यातर्फे पडताळणी; 50 कोटी रुपयांची वसूली

Gas Cylinder Seizure: 1021 पैकी 485 सिलिंडर रिकामे, वजनमाप खात्‍याकडून मोजणी; अहवाल मिळाल्‍यानंतर पोलिस करणार कारवाई

SCROLL FOR NEXT