IND vs USA FIH Women Olympic Qualifier Twitter
क्रीडा

IND vs USA FIH Women Olympic Qualifier: अमेरिकेने टीम इंडियाची उडवली दाणादाण; ऑलिम्पिकची सीट धोक्यात

IND vs USA FIH Women Olympic Qualifier: एफआईएच (FIH) महिला ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत भारत आणि अमेरिका यांच्यात सामना झाला.

Manish Jadhav

IND vs USA FIH Women Olympic Qualifier: एफआईएच (FIH) महिला ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत भारत आणि अमेरिका यांच्यात सामना झाला. या सामन्यात टीम इंडियाला अमेरिकेविरुद्ध 0-1 ने पराभवाचा सामना करावा लागला. जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर असलेल्या टीम इंडियाने या सामन्यात अनेक संधी गमावल्या. त्यामुळे या सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात भारताला एकूण सात पेनल्टी कॉर्नर मिळाले होते, मात्र एकाही पेनल्टी कॉर्नरचे त्यांना गोलमध्ये रुपांतर करता आले नाही.

दरम्यान, जागतिक क्रमवारीत 24व्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकन संघाने सामन्याच्या 16व्या मिनिटाला गोल केला. जो या संपूर्ण सामन्यातील एकमेव गोल होता. अमेरिकेसाठी अबीगॅल टॅमर हा गोल केला. या पराभवामुळे भारताचा पॅरिस ऑलिम्पिकमधील मार्ग अधिक खडतर होणार आहे, कारण पुढील सामन्यांमध्ये भारताला बलाढ्य संघांचा सामना करावा लागणार आहे. जिथे विजय मिळवणे त्यांच्यासाठी सोपे काम नसेल.

दरम्यान, पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. दोन्ही संघ सर्कलमध्ये प्रवेश करण्यात यशस्वी ठरले मात्र गोल करु शकले नाहीत. टीम इंडियाला दोन्ही बाजूंनी चांगले आक्रमण करता आले नाही, मात्र, अमेरिकेने आपल्या आक्रमणात कोणतीही चूक केली. पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर करणे हे या सामन्यात टीम इंडियासाठी सर्वात कठीण काम होते.

दुसऱ्या क्वार्टरला सुरुवात झाल्यानंतर लगेचच टीम इंडियाला मोठा धक्का बसला जेव्हा अमेरिकेने दुसऱ्या क्वार्टरमध्ये टॅमरने एका मिनिटानंतर आपल्या संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. यादरम्यान, भारताचा बचाव खूपच खराब होता. सततच्या दबावामुळे भारताला तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले परंतु अमेरिकेने त्यांचा भक्कम बचाव केला. पहिल्या हाफच्या काही मिनिटे आधी भारताला आणखी दोन संधी मिळाल्या होत्या.

दुसऱ्या हाफमध्ये टीम इंडियाला धडा घेतला नाही. अमेरिकेने भारताला मिळालेल्या सर्व संधी हाणून पाडल्या. भारताने चेंडू बराच काळ रोखून धरला आणि हीच रणनीती त्यांना महागात पडली. जेव्हा जेव्हा भारतीय खेळाडू अमेरिकन सर्कलमध्ये पोहोचले तेव्हा त्यांच्याकडे नियोजनाचा अभाव होता.

चौथ्या क्वार्टरमध्येही एका गोलने पिछाडीवर असलेल्या टीम इंडियाला 48व्या मिनिटाला सातवा पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्यानंतर अमेरिकेने लागोपाठ तीन पेनल्टी कॉर्नर मिळवले मात्र त्यांनाही गोल करता आला नाही. शेवटी टॅमरचा गोल निर्णायक ठरला. आता भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे तर रविवारी अमेरिकेचा सामना इटलीशी होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Birch Fire Case: हडफडे अग्निकांडातील मुख्य आरोपी लुथरा बंधू उद्या गोव्यात होणार दाखल; ट्रान्झिट रिमांड मिळाल्याने कारवाईला वेग VIDEO

IPL Mini Auction 2026: धोनीच्या चेन्नईत नव्या दमाच्या खेळाडूंची एन्ट्री! दोन अनकॅप्ड खेळाडूंवर 28 कोटींची उधळण; प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा कोट्यधीश

"लग्न केवळ कागदावर उरलं असेल तर ते तोडणंच बरं!" 24 वर्षांपासून रखडलेल्या घटस्फोटाच्या वादावर सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

IPL Mini Auction 2026: केकेआरचा 'मास्टरस्ट्रोक'! मथीशा पाथिरानाला 18 कोटींत केलं खरेदी; सीएसकेच्या 'बेबी मलिंगा'वर शाहरुखने लावली मोठी बोली

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

SCROLL FOR NEXT