Sachin Tendulkar & Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

IND VS SA: 9 धावा अन्…विराटला सजदा करणार क्रिकेट जगत, सचिनचा विक्रम मोडणार!

एकदिवसीय मालिकेत सर्व चाहत्यांच्या नजरा विराट कोहलीवर (Virat Kohli) असतील कारण तो 4 वर्षांनंतर प्रथमच एकदिवसीय सामना खेळणार आहे.

दैनिक गोमन्तक

भारत आणि दक्षिण आफ्रिका (India v South Africa, 1st ODI) संघ बुधवारपासून तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत आमनेसामने येणार आहे. रोमांचक कसोटी मालिकेनंतर, एकदिवसीय सामन्यातही दोन्ही संघांमध्ये शानदार सुरुवात होणार आहे. मात्र एकदिवसीय मालिकेत सर्व चाहत्यांच्या नजरा विराट कोहलीवर असतील कारण तो 4 वर्षांनंतर प्रथमच एकदिवसीय सामना खेळणार आहे.

दक्षिण आफ्रिका (South Africa) दौऱ्यापूर्वी विराट कोहलीला (Virat Kohli) वनडे कर्णधारपदावरुन हटविण्यात आले होते. यानंतर विराटने केपटाऊन (Cape Town) कसोटीनंतर कसोटी कर्णधारपदही सोडले. विराट कोहलीला वनडे मालिकेत मोठा विक्रम मोडण्याची संधी आहे. विराट कोहली फक्त 9 धावा करुन (Sachin Tendulkar) ला पाठीमागे टाकू शकतो.

खरं तर, भारतासाठी परदेशात सर्वाधिक वनडे धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीत परदेशी भूमीवर 5065 धावा केल्या होत्या तर विराट कोहलीने 5057 धावा केल्या आहेत. अर्थातच 9 धावा होताच विराट सचिनला मागे टाकेल.

विराट परदेशात सचिनपेक्षा जास्त वेगाने धावा करत

सचिन तेंडुलकरने परदेशात खेळलेल्या 146 एकदिवसीय डावांमध्ये 37.24 च्या सरासरीने 5065 धावा केल्या आहेत. त्याने परदेशात 12 शतके झळकावली होती. त्याचबरोबर विराट कोहलीने केवळ 103 डावात 58.12 च्या सरासरीने 5057 धावा केल्या आहेत. विराटने परदेशात 20 शतके झळकावली आहेत.

तसेच, विराट कोहलीकडूनही दक्षिण आफ्रिकेच्या वनडे मालिकेतील शतकाचा दुष्काळ संपुष्टात येईल अशी अपेक्षा आहे. विराट कोहलीने गेल्या दोन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावलेले नाही. मात्र बुधवारपासून सुरु होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत विराट चांगली सुरुवात करु शकतो. विराट कोहलीने 2017-18 मध्ये दक्षिण आफ्रिकेतील एकदिवसीय मालिकेदरम्यान 6 सामन्यांमध्ये 186 च्या सरासरीने 558 धावा केल्या, ज्यात 3 शतकांचा समावेश आहे.

गेल्या 2 वर्षात विराटची वनडे कामगिरी घसरली

विराट कोहली गेल्या 2 वर्षात फक्त 10 वनडे खेळला आहे आणि यादरम्यान त्याची कामगिरी देखील त्याच्या पातळीनुसार निराशाजनक राहिली आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये 60 च्या सरासरीने धावा करणाऱ्या विराटने गेल्या 10 सामन्यांमध्ये 46.60 च्या सरासरीने 466 धावा केल्या आहेत. त्याच्या बॅटमधून 6 अर्धशतके नक्कीच झळकली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT