BCCI President Sourav Ganguly

 

Dainik Gomantak 

क्रीडा

IND vs SA: 'कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने रचला इतिहास'

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी ट्विटर करत म्हटले की, या विजयामुळे मला आश्चर्य वाटत नाही.

दैनिक गोमन्तक

भारतीय संघाने गुरुवारी सेंच्युरियन कसोटीत (Centurion Test) दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. याआधी आशियातील कोणताही संघ सेंच्युरियनमध्ये दक्षिण आफ्रिकेला हरवू शकला नसला तरी विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखाली टीम इंडियाने (Team India) इतिहास रचला. भारताच्या या विजयाचा जल्लोष देशभरात साजरा केला जात आहे. दरम्यान, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी ट्विटर करत म्हटले की, या विजयामुळे मला आश्चर्य वाटत नाही.

दरम्यान, सौरव गांगुलीला (BCCI President Sourav Ganguly) कोरोनाची लागण (Coronavirus) झाली होती. त्याच्यावर कोलकाता येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गांगुलीची आरटी-पीसीआर चाचणी कोविड- पॉझिटिव्ह आली, त्यानंतर खबरदारी म्हणून सोमवारी रात्री त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी त्याला डिस्चार्ज देण्यात आला. हॉस्पिटलमध्ये राहूनही तो क्रिकेटपासून दूर नव्हता. तो सामन्याचा धांडोळा घेत होता. त्यानेही टीम इंडियाने सामना जिंकल्यानंतर विजयासाठी शुभेच्छाही दिल्या.

गांगुलीने विजयाचे अभिनंदन केले

संघाच्या विजयानंतर सौरव गांगुलीने स्पष्टपणे सांगितले की, या विजयाने आपल्याला आश्चर्य वाटत नाही. गांगुलीने ट्विट करत म्हटले की, ''टीम इंडियाचा मोठा विजय आहे. परंतु निकालाने मला अजिबात आश्चर्य वाटत नाही. ही मालिका जिंकण्यासाठी एका तडफदार संघाची आवश्यकता आहे. हे करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला टीम इंडियाशी निकराने झुंझावे लागणार आहे. नवीन वर्षाचा आनंद घ्या.'' या मालिकेपूर्वी सौरव गांगुली आणि विराट कोहली यांच्यात कर्णधारपदावरुन वाद झाला होता. मात्र गांगुलीच्या ट्विटमुळे आता या वादावर पडदा पडला आहे. या मालिकेपूर्वीच गांगुलीने सांगितले होते की, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेत इतिहास रचून पुनरागमन करेल. या विजयासह कोहलीने स्वत:ला एक शानदार कर्णधार समाविष्ट केले आहे.

शिवाय, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा 40 वा कसोटी विजय आहे. कर्णधार म्हणून कसोटी क्रिकेटमधील विजयांच्या बाबतीत कोहली आता फक्त ग्रॅम स्मिथ (53), रिकी पाँटिंग (48) आणि स्टीव्ह वॉ (41) यांच्या मागे आहे. उभय देशांमधला पुढचा सामना 3 जानेवारीपासून जोबर्ग येथे होणार आहे. टीम इंडिया 2022 मध्येही आपली दमदार कामगिरी कायम ठेवेल अशी अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT