Rishabh Pant Dainik Gomantak
क्रीडा

IND vs SA: ऋषभ पंतने 'द वॉल' चा 21 वर्षांचा मोडला विक्रम, पण...

भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतने (Rishabh Pant) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शानदार अर्धशतक झळकावले.

दैनिक गोमन्तक

भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शानदार अर्धशतक झळकावले. पंतने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला, परंतु त्याला पहिले एकदिवसीय शतक पूर्ण करता आले नाही. पार्लमधील बोलँड पार्कमध्ये होत असलेल्या दुसऱ्या वनडेत पंतने अवघ्या 71 चेंडूत 85 धावा फटकावल्या, ज्यात 10 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. यासह पंतने (Rishabh Pant) कर्णधार केएल राहुलसोबत तिसऱ्या विकेटसाठी 115 धावांची भागीदारी करुन टीम इंडियाला (Team India) कठीण परिस्थितीतून बाहेर काढले. परंतु पंत शतक पूर्ण करु शकला नाही. यादरम्यान त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. (IND vs SA Rishabh Pant Breaks Coach Rahul Dravids 21Year Record)

दरम्यान, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि विराट कोहली (Virat Kohli) लवकर बाद झाल्यानंतर पंतला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले. गेल्या सामन्यातही पंत याच क्रमांकावर आला होता. परंतु तो फारसा प्रभाव पाडू शकला नव्हता. पंतने संघासाठी मोठी धावसंख्याही उभारली. राहुल सलामीला येण्यापूर्वीच पंतने आपल्या वनडे कारकिर्दीतील चौथे अर्धशतक अवघ्या 43 चेंडूत झळकावले.

राहुल द्रविडचा विक्रम

पंतने विशेषतः दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) फिरकी गोलंदाज तबरेझ शम्सीवर चौकार मारला. मात्र, शम्सीने 33 व्या षटकात पंतला लाँग बाऊंड्रीवर बाद करुन शतकाची संधी हिरावून घेतली. असं असतानाही पंतने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. 24 वर्षीय पंतने दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर भारतीय यष्टीरक्षकाकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे.

पंत-राहुलची शतकी भागीदारी

पंतने राहुलसोबत तिसऱ्या विकेटसाठी 115 धावांची भागीदारी केली. भारताला 33 व्या षटकात 183 धावांपर्यंत पोहोचवले. दरम्यान राहुलनेही आपले अर्धशतक पूर्ण केले, मात्र पंतच्या एका षटकात तो बाद झाला. भारतीय कर्णधाराने 79 चेंडूत 55 धावांची खेळी उभारली, ज्यात त्याने 4 चौकार मारले. मात्र सिसांडा मगालाने त्याला बाद केले. त्याचवेळी पुन्हा एकदा एडन मार्कराम आणि केशव महाराज यांनीही यश संपादन केले. मार्करामने धवनला पॅव्हेलियनमध्ये तर महाराजने कोहलीला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Edberg Pereira Assault Video: पोलिसांनी लाथा घातल्या, मारहाण केली; परेरा मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर, पाहा व्हिडिओ

Edberg Pereira Assault Case: एडबर्ग परेरा मारहाण प्रकरणी निलंबित PSI निलेश वळवईकरांवर गुन्हा दाखल; पुढील तपास सुरु

Sleep Problem: झोपण्यापूर्वीच्या 'या' चुका तुम्हाला बनवत आहेत आजारी! वेळीच व्हा सावध

Poseidon Nuclear Drone: हिरोशिमा बॉम्बपेक्षा 6600 पट शक्तिशाली, पुतिन यांनी जगाला दाखवलं अणुशक्तीवर चालणाऱ्या ड्रोनचं विनाशकारी रुप; अमेरिका-नाटो चिंतेत VIDEO

Watch Video: हाय सायबा!! डोक्यावर धो-धो पाऊस तरीही पालिका इमारतीच्या छतावर चढला कामगार; म्हापशातला गजब प्रकार Viral

SCROLL FOR NEXT