<div class="paragraphs"><p>Team India</p></div>

Team India

 

Dainik Gomantak 

क्रीडा

IND VS SA: टीम इंडियाने रचला इतिहास, जाणून घ्या ऐतिहासिक विजयाची 5 मोठी कारणे

दैनिक गोमन्तक

ज्या मैदानावर कोणत्याही आशियाई संघाला जिंकणे अशक्य मानले जात होते. ज्या मैदानाची खेळपट्टी आशियातील दिग्गज फलंदाजांसाठी घातक बनली होती. याच 22 यार्डच्या पट्टीवर टीम इंडियाने (Team India) इतिहास रचला आहे. गुरुवारी टीम इंडियाने सेंच्युरियनचा अभेद्य किल्ला जिंकला. सेंच्युरियन (centurion) कसोटीच्या पाचव्या दिवशी टीम इंडियाला विजयासाठी 6 विकेट्सची गरज होती. भारतीय गोलंदाजांनी यजमान दक्षिण आफ्रिकेला (South Africa) दुपारनंतर 191 धावांत गुंडाळले. भारतीय संघाने हा सामना 113 धावांनी जिंकत कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. अखेर टीम इंडिया सेंच्युरियनच्या मैदानावर कशी यशस्वी झाली, याची पाच मोठी कारणे जाणून घेऊया...

1. उत्कृष्ट भागीदारी

पहिल्या डावात केएल राहुल (KL Rahul) आणि मयंक अग्रवाल (mayank agarwal) यांच्या सलामीच्या भागीदारीने सेंच्युरियनमध्ये विजयाचा सर्वात मोठा पाया रचला. चकवा देणाऱ्या खेळपट्टीवर दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी 117 धावांची भागिदारी केली. त्यामुळे भारतीय संघ 327 धावा करु शकला. राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांच्या खराब गोलंदाजीचा पुरेपूर फायदा घेतला. मयंकने अर्धशतक ठोकले आणि केएल राहुलने शतक झळकावले.

2. राहुलने जबाबदारी पार पाडली

रोहित शर्माच्या (rohit sharma) अनुपस्थितीत केएल राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार झाला आणि त्याने बराच वेळ क्रीजवर राहण्याची जबाबदारी घेतली. राहुलने खाते उघडण्यासाठी 21 चेंडू खेळला अन् त्यानंतर सेट झाल्यानंतर त्याने मोठे शॉट्स लगावण्यास सुरुवात केली. राहुलने 16 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 123 धावा केल्या. मोठी गोष्ट म्हणजे सेंच्युरियनच्या कठीण अशा खेळपट्टीवर त्याने 260 चेंडू खेळला.

3. दक्षिण आफ्रिकेला शमीने 'पंजात' पकडले

सेंच्युरियनच्या खेळपट्टीवर, जिथे दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज योग्य लाईन-लेन्थने गोलंदाजी करु शकत नव्हते, तिथे मोहम्मद शमीने अचूक गोलंदाजी करुन आपली ताकद दाखवून दिली. शमीने पहिल्या डावात पाच बळी घेत दक्षिण आफ्रिकेचा संघ 197 धावांत गुंडाळला. विशेष म्हणजे जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे पहिल्या डावात केवळ 7.2 षटकेच टाकू शकला, परंतु शमीने त्याला त्याची कमतरता जाणवू दिली नाही.

4. दुसऱ्या डावातही गोलंदाजांनी आपली ताकद दाखवली

सेंच्युरियन कसोटीच्या दुसऱ्या डावातही वेगवान गोलंदाजांनी आपली ताकद दाखवली. यावेळी जसप्रीत बुमराहने अप्रतिम सुरुवात केली आणि महत्त्वाच्या प्रसंगी संघाला ३ बळी मिळवून दिले. शमीही मागे राहिला नाही आणि त्यानेही दुसऱ्या डावातही 3 बळी घेतले. सिराज आणि अश्विनने 2-2 बळी घेत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.

5. विराट कोहलीसाठी नाणेफेक जिंकणे खूप महत्त्वाचे

सेंच्युरियनमध्ये नाणेफेक जिंकणे हेही टीम इंडियाच्या विजयाचे महत्त्वाचे कारण होते. सेंच्युरियनमध्ये विराट कोहलीने नाणे जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यामुळे त्याला चौथ्या डावात फलंदाजी करावी लागली नाही. सेंच्युरियनच्या खेळपट्टीवर चौथ्या डावात फलंदाजी करणे खूप कठीण आहे. या खेळपट्टीवर 250 धावांचा पाठलाग करणेही अवघड ठरते आणि यावेळीही तेच दिसून आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Final Vote Turnout: गोव्यात 75.20 टक्के मतदान

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT