Jitesh Sharma  Dainik Gomantak
क्रीडा

SA vs IND, 3rd T20I: जितेश शर्माच्या नावावर नोंदवला गेला नकोसा रेकॉर्ड; श्रेयस-राहुलच्या क्लबमध्ये सामील

SA vs IND: कर्णधार सूर्यकुमार यादवच्या शतकाच्या जोरावर भारताने या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सात विकेट्स गमावून 201 धावा केल्या.

Manish Jadhav

SA vs IND, 3rd T20I: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तिसरा टी-20 सामना खेळला जात आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या शतकाच्या जोरावर भारताने या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सात विकेट्स गमावून 201 धावा केल्या. डावाच्या शेवटच्या षटकात भारताने तीन विकेट गमावल्या. सूर्यकुमार यादव शतक झळकावून बाद झाला. रवींद्र जडेजा धावबाद झाला आणि जितेश शर्मा हिट विकेट झाला. यासह यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्माच्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदवला गेला. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये हिट विकेट होणारा तो पाचवा भारतीय खेळाडू ठरला आहे.

दरम्यान, जितेश शर्मा डावाच्या शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात असताना त्याचा पाय स्टंपला लागला, त्यामुळे बेल्स पडली. अशाप्रकारे जितेश शर्मा हिट विकेट होणारा पाचवा भारतीय ठरला. त्याच्याआधी केएल राहुल, हर्षल पटेल, हार्दिक पांड्या आणि श्रेयस अय्यर अशाप्रकारे टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आउट झाले आहेत.

दुसरीकडे, या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकात 7 गडी गमावून 201 धावा केल्या. भारताकडून फलंदाजी करताना कर्णधार सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 100 धावांची खेळी केली. याशिवाय सलामीवीर यशस्वी जयस्वालनेही 60 धावांची शानदार खेळी केली. रिंकू सिंहने 14 आणि शुभमन गिलने 12 धावांचे योगदान दिले. या सामन्यात तिलक वर्मा फ्लॉप ठरला. तिलकला खातेही न उघडता आले नाही. दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजी करताना केशव महाराज आणि विल्यम्सने प्रत्येकी 2 बळी घेतले. या सामन्यात केशव महाराजने शानदार गोलंदाजी करत पहिल्याच षटकात टीम इंडियाला दोन मोठे धक्के दिले. आता हा सामना जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेसमोर 202 धावांचे लक्ष्य आहे.

मेन्स T20I मध्ये हिट विकेट झालेले भारतीय :-

केएल राहुल विरुद्ध श्रीलंका, 2018

हर्षल पटेल विरुद्ध न्यूझीलंड, 2021

हार्दिक पांड्या विरुद्ध इंग्लंड, 2022

श्रेयस अय्यर विरुद्ध न्यूझीलंड, 2022

जितेश शर्मा विरुद्ध एसए, आज

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

7th Pay Commission Goa: सातवा वेतन आयोग लागू करा! गोव्यातील पंचायत कर्मचाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Ratnagiri: 'समुद्रस्नान' जीवावर बेतलं!गणपतीपुळे समुद्रात तीन पर्यटक बुडाले; एकाचा मृत्यू, दोघांना वाचवण्यात यश

Anaya Bangar Viral Video: ट्रान्सजेंडर क्रिकेटर अनाया बांगरचं दमदार कमबॅक, RCB ची किट बॅग घेऊन केली प्रॅक्टिस, WPL मध्ये खेळणार?

प्रभुदेसाईंच्या आंदोलनानंतर कृषी विभागाचे आश्वासन; भातकापणीसाठी देणार नवीन यंत्र

प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली, घरात कोंडलेल्या पत्नीच्या डोक्यात कट शिजला; झोपेच्या गोळ्या देऊन ओढणीने गळा आवळत पतीचा काटा काढला

SCROLL FOR NEXT