SA vs IND, 3rd T20I: शुभमन गिलचं बॅडलक, जयस्वालचं ऐकलं नसतं तर...

SA vs IND, 3rd T20I: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना सध्या जोहान्सबर्गच्या न्यू वांडरर्स स्टेडियमवर खेळला जात आहे.
Shubman Gill
Shubman Gill Dainik Gomantak
Published on
Updated on

SA vs IND, 3rd T20I: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना सध्या जोहान्सबर्गच्या न्यू वांडरर्स स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात आफ्रिकन संघाचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांनी पहिल्या विकेटसाठी 29 धावांची जलद भागीदारी केली. यानंतर केशव महाराजने तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर गिलला एलबीडब्ल्यू आऊट करुन भारताला पहिला धक्का दिला. मात्र, नंतर रिप्ले पाहिला असता तर गिलला नॉट आउट घोषित करण्यात आले असते.

दरम्यान, शुभमन गिलने तिसर्‍या टी20 सामन्यात अत्यंत आक्रमक फलंदाजीला सुरुवात केली, ज्यात त्याने 6 चेंडूत 12 धावांच्या खेळीत 2 चौकारही मारले. तर केशव महाराजविरुद्ध गिलने स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला असता चेंडू थेट त्याच्या पॅडला लागला. यानंतर अंपायरने आउट देण्यास उशीर केला नाही. नॉन स्ट्राइक एंडला उभा असलेला त्याचा सहकारी यशस्वीशी बोलल्यानंतर गिल थेट पॅव्हेलियनच्या दिशेने गेला. मात्र, नंतर जेव्हा या आउटचा रिप्ले पाहण्यात आला, तेव्हा चेंडू लेग स्टंपवर दिसत नव्हता. या रिप्लेनंतर डगआउटमध्ये बसलेले मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडही खूपच निराश दिसले. गिलने डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला असता तर तो नॉट आउट घोषित झाला असता. त्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर भारताला दुसरा धक्का तिलक वर्माच्या रुपाने बसला, जो खातेही न उघडता गोल्डन डकवर बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला.

Shubman Gill
SA vs IND, 3rd T20I: द. आफ्रिकेने जिंकला टॉस! 'हा' खेळाडू करणार पदार्पण, पाहा प्लेइंग-11

T20 मध्ये, गिलला आतापर्यंत 13 पैकी 8 डावांमध्ये दुहेरी आकडा गाठता आलेला नाही

शुभमन गिलने आत्तापर्यंतच्या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याच्या छोट्या कारकिर्दीत एकूण 13 डावांमध्ये फलंदाजी केली आहे, ज्यामध्ये तो 8 वेळा दुहेरी आकडा देखील पार करु शकला नाही. गिलने आतापर्यंत 13 टी-20 सामन्यात 26.33 च्या सरासरीने 316 धावा केल्या आहेत, ज्यात एक शतक आणि एक अर्धशतकाचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com