Hardik Pandya Dainik Gomantak
क्रीडा

T20 World Cup: भारत-पाक सामन्यादरम्यान ग्लॅमरचा तडका, तुम्ही म्हणाल...

T20 World Cup 2022: 23 ऑक्टोबरच्या सामन्याची जगभरातील क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत

दैनिक गोमन्तक

T20 World Cup 2022: 23 ऑक्टोबरच्या सामन्याची जगभरातील क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत, या तारखेला भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. हा शानदार सामना पाहण्यासाठी अनेक दिग्गज क्रिडापटूंसह, सेलिब्रेटी हजेरी लावणार आहेत. ज्यामध्ये, भारतीय खेळाडूंच्या अर्धांगीणींचाही समावेश आहे.

दरम्यान, हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) पत्नी नताशा स्टॅनकोविक देखील मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर हजेरी लावू शकते. या मोठ्या सामन्यापूर्वी नताशा स्टॅनकोविकही ऑस्ट्रेलियाला (Australia) पोहोचली आहे. नताशाने याआधी अनेक सामन्यांना हजेरी लावली आहे.

दुसरीकडे, टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज यजुवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माही सध्या ऑस्ट्रेलियात आहे. हा शानदार सामना पाहण्यासाठी धनश्री वर्मा पोहोचू शकते. अनेक प्रसंगी धनश्री चहलला प्रोत्साहित करताना दिसून आली आहे. त्याचबरोबर, टीम इंडियाचा (Team India) कर्णधार रोहित शर्माची (Rohit Sharma) पत्नी रितिका सजदेह सुध्दा सामना पाहण्यासाठी हजेरी लावू शकते. रितिका रोहितची मॅनेजर देखील आहे, त्यामुळे ती हा सामना पाहण्यासाठी पोहोचू शकते.

तसेच, हा सामना पाहण्यासाठी दिनेश कार्तिकची पत्नी दीपिका पल्लीकलही पोहोचली आहे. यावेळी चाहते विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माला मिस करतील. कारण अनुष्का अजूनही भारतातच आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT