भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात दुसऱ्या कसोटीसाठी मुंबईत सामना होत आहे. शुक्रवारी वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) पावसामुळे उशिरा सुरु झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. रात्री पावसामुळे पहिले सत्र खेळता आले नाही. पंचांनी 9.30 आणि 10.30 वाजता दोन वेळा खेळपट्टीची पाहणी केल्यानंतर 11.30 वाजता नाणेफेकसाठी बोलवण्याचा निर्णय घेतला. पावसामुळे तसेच खेळाडू जखमी झाल्यामुळे या सामन्यावर परिणाम झाला. दोन्ही संघातील एकूण चार खेळाडू दुखापतीमुळे बाहेर पडले. यामुळे 133 वर्ष जुन्या विक्रमाची बरोबरी झाली आहे.
दरम्यान, मुंबई कसोटीत भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांचे कर्णधार बदलले आहेत. टीम इंडियाचा कर्णधार म्हणून विराट कोहली (Virat Kohli) परतल्यावर किवी संघाला केन विल्यमसनशिवाय (Kane Williamson) जावे लागले. त्याची जागा टॉम लॅथमने (Tom Latham) घेतली. यापूर्वी कानपूर कसोटीत अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) भारताचा आणि विल्यमसन न्यूझीलंडचा कर्णधार होता. अशा प्रकारे, दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत चार खेळाडू कर्णधाराच्या भूमिकेत आले. 1888-89 च्या इंग्लंड-दक्षिण आफ्रिका मालिकेनंतर दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत चार वेगवेगळे कर्णधार बनवण्याची ही पहिलीच वेळ आहे. 1888-89 मालिकेतील पहिल्या कसोटीत ऑब्रे स्मिथ इंग्लंडचे प्रमुख होते आणि ओवेन ड्युने दक्षिण आफ्रिकेचे प्रमुख होते. त्यानंतर दुसऱ्या कसोटीत मॉन्टी बाउडेन इंग्लंडचा कर्णधार झाला आणि विल्यम मिल्टन दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार झाला.
दोन्ही संघात चार बदल
मुंबई कसोटीत भारताचे तीन आणि न्यूझीलंडचे एक खेळाडू दुखापतीमुळे बाहेर पडले होते. उपकर्णधार अजिंक्य रहाणे, वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा दुखापतीमुळे भारतीय संघाबाहेर आहेत. रहाणे हॅमस्ट्रिंगच्या दुखण्यामुळे खेळू शकला नाही. या तिघांच्या दुखापती किती गंभीर आहेत, याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. नाणेफेकीच्या वेळी मात्र कर्णधार विराट कोहलीने तिघांनाही निगल असल्याचे सांगितले. म्हणजेच हे तिघेही दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी उपलब्ध असतील.
कर्णधार विराट कोहली कानपूरमधील पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर पडल्यानंतर संघात परतला आहे, तर मोहम्मद सिराज आणि जयंत यादव यांनाही संधी देण्यात आली आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनही कोपराच्या दुखापतीमुळे खेळत नाहीये. विल्यमसनच्या जागी डॅरिल मिशेलने न्यूझीलंड संघात स्थान मिळवले आहे. कोपराच्या दुखापतीमुळे विल्यमसन बऱ्याच दिवसांपासून अडचणीत आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.