Ken Williamson & Virat Kohli  Dainik Gomantak
क्रीडा

T20 World Cup 2021: 'ही' आहेत टीम इंडियाच्या पराभवाची कारणे

T20 विश्वचषक 2021 मधील न्यूझीलंडचा हा पहिलाच विजय असला तरी भारताला आता उपांत्य फेरी गाठणे जवळपास अशक्य झाले आहे.

दैनिक गोमन्तक

2 सामने… 2 पराभव. ज्या संघात केएल राहुल, विराट कोहली, रोहित शर्मा, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह असे खेळाडू असतील, त्या संघाची टी-20 विश्वचषकात अशी अवस्था होईल, असे कोणाला वाटले असेल. पाकिस्तानकडून सामना हरल्यानंतर भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्धही दारूण पराभव स्वीकारावा लागला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये टीम इंडियाची फलंदाजी पूर्णपणे फ्लॉप ठरली. संघाला 20 षटकात केवळ 110 धावा करता आल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघाने केवळ 2 गडी गमावून हे लक्ष्य सहज गाठले. T20 विश्वचषक 2021 मधील न्यूझीलंडचा हा पहिलाच विजय असला तरी भारताला आता उपांत्य फेरी गाठणे जवळपास अशक्य झाले आहे.

न्यूझीलंडने टॉस जिंकत भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. आणि तोच निर्णय टीम इंडियासाठी कसोटीचा ठरला. केएल राहुल आणि इशान किशन सलामीला आले मात्र तिसऱ्या षटकातच ही जोडी फोडण्यामध्ये न्यूझीलंडच्या गोलंदाजांना यश आले. इशान किशनने अवघ्या 4 धावा केल्या. केएल राहुलही 18 धावा करुन बाद झाला. रोहित शर्मालाही केवळ 14 धावा करता आल्या. विराट कोहलीनेही 9 धावा केल्या. पंतला 19 चेंडूत 12 धावाच करता आल्या. पंड्याने 23 आणि जडेजाने नाबाद 26 धावा केल्या आणि कसं बसं टीम इंडियाला 100 च्या पुढे घेऊन जण्यात त्यांना यश आले. परंतु दुबईच्या खेळपट्टीवर ही धावसंख्या खूपच कमी होती. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने अवघ्या 20 धावांत 3 बळी घेतले. ईश सोधीनेही 17 धावांत 2 बळी घेतले. सौदी आणि मिलानला 1-1 विकेट मिळाली.

न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली

न्यूझीलंडला 111 धावांचे लक्ष्य गाठण्यात कोणतीही अडचण आली नाही. सुरुवात खराब झाली, मार्टिन गप्टिल 20 धावा करून बाद झाला. त्याला बुमराहने बाद केले पण त्यानंतर केन विल्यमसनसह डॅरेल मिशेलने ७२ धावा जोडून भारताकडून सामना हिसकावून घेतला. मिचेलने 35 चेंडूत 49 धावा केल्या. मिशेललाही जसप्रीत बुमराहने बाद केले.

सलामीची जोडी आजही फॉल्फ

T20 विश्वचषक 2021 मध्ये पाकिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर भारतीय फलंदाजीही न्यूझीलंडविरुद्ध फ्लॉप ठरली. भारताने 20 षटकात फक्त 110 धावा केल्या. केएल राहुल, विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत या तुफानी फलंदाजांनी सज्ज असलेल्या टीम इंडियाला किवी गोलंदाजांना मोकळेपणाने खेळूच दिले नाही. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने सर्वाधिक 3 बळी घेतले. मिल-टिम साऊथीलाही 1-1 विकेट मिळाली पण लेगस्पिनर इश सोधीने टीम इंडियाचे सर्वाधिक नुकसान केले. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे टीम इंडियाच्या सलामीच्या जोडीला म्हणावा तसा आपला जलवा दाखवता आला नाही. केएल राहुल इशान किशानने भारताच्या डावाची सुरुवात केली मात्र दोघांनाही आपल्या कामगिरीमध्ये म्हणावा तसा जलवा दाखवता आला नाही.

हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंतचा जलवा आजही नाही

मागील काही दिवसांपासून टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या दुखापतीचा सामना करत आहे. पाकिस्तानविरुध्द झालेल्या सामन्यामध्येही हार्दीकला म्हणावी तसी कामगिरी करता आली नाही. त्याचबरोबर आज झालेल्या न्यूझीलंड सामन्यातही हार्दीकची फलंदाजी आणि गोलंदाजी सुमारच राहीली.

आत्मविश्वासाचा अभाव

या टी-ट्वेन्टी विश्वचषकामध्ये टीम इंडियामध्ये आत्मविश्वासाचा अभाव दिसून आला.पाकिस्तानविरुध्द झालेल्या सामन्यामध्ये भारतीय संघाच्या फलंदाजांना आणि गोलंदाजांना म्हणावा तसा जलवा दाखवता आला नाही. त्याचबरोबर आज पार पडलेल्या न्यूझीलंडविरुध्दच्या सामन्यातही संघामध्ये आत्मविश्वासाचा अभाव दिसून आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Kisan 23rd Installment: ठरलं! 'या' दिवशी खात्यात जमा होणार 2,000 रुपये, आजच उरका 'ही' 4 महत्त्वाची कामं अन्यथा पैसे अडकणार

Women Reservation Bill 2026: 30 वर्षांची प्रतीक्षा अन् शेवटी निराशाच! लोकसभेत 'महिला आरक्षणा'चं स्वप्न का भंगलं?

Operation Sindoor: घरात घुसून पाकड्यांना ठोकलं! एक वर्षांनंतरही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळात; 'ऑपरेशन सिंदूर'नं मोडलं कंबरडं

Allahabad High Court: "कुटुंबाचा खर्च उचलू शकत नसाल तर लग्नच करु नका!", हायकोर्टाची जळजळीत टिप्पणी; पोटगी नाकारणाऱ्या पतीला मोठा दणका

US Iran War: डोनाल्ड ट्रम्पचा 'डेंजरस' इशारा! इराणचाही चर्चेला नकार आणि युद्धाची ललकारी; घालिबाफ म्हणाले, "धमक्यांनी इराण दबणार नाही!"

SCROLL FOR NEXT