IND vs NZ: team India second T20 match by 7 wickets ready for white wash  Twitter @BCCI
क्रीडा

IND vs NZ: टीम इंडिया व्हाईट वॉश साठी सज्ज !

भारतीय संघाने शुक्रवारी रांची येथे झालेल्या दुसऱ्या T-20 लढतीतही न्यूझीलंडला 7 बळी व 16 चेंडू राखून धूळ चरत तीन सामन्यांच्या T-20 मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली.

दैनिक गोमन्तक

राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) मार्गदर्शनात व रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाचे (Indian Cricket Team) नवे पर्व अगदी दिमाखात सुरू झाले आहे. जयपूर येथे झालेल्या पहिल्या T-20 लढतीत विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाने शुक्रवारी रांची येथे झालेल्या दुसऱ्या T-20 लढतीतही न्यूझीलंडला (IND vs NZ) 7 बळी व 16 चेंडू राखून धूळ चरत तीन सामन्यांच्या T-20 मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. हर्षल पटेल याने पहिल्याच लढतीत आपली चमक दाखवली आहे . रवीचंद्रन अश्‍विन (Ravichandran Ashwin) व अक्षर पटेल (Axar Patel) यांच्या प्रभावी फिरकीसमोर न्यूझीलंडचे फलंदाज निष्प्रभ ठरले. तर 154 धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा व लोकेश राहुल यांनी धडाकेबाज अर्धशतक झळकावत टीम इंडियाच्या मालिका विजयावर शिक्कामोर्तब केले . (IND vs NZ: team India second T20 match by 7 wickets ready for white wash)

याआधी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मार्टिन गुप्टिल व डॅरेल मिशेल यांनी 48 धावांची भागीदारी करताना भारतीय गोलंदाजांचे आव्हान थोपवून लावले. दीपक चहरने मिर्टीन गुप्टिलला 31 धावांवर बाद करीत न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. त्याने आपली खेळी तीन चौकार व दोन षटकारांनी सजवली. त्यानंतर फिरकी गोलंदाज अक्षर पटेल याने मार्क चॅपमनला 21 धावांवर लोकेश राहुलकरवी झेलबाद केले. मध्यमगती गोलंदाज हर्षल पटेलने डॅरेल मिशेलला सूर्यकुमार यादवकरवी 31 धावांवर झेलबाद करीत भारतासाठी मोठी कामगिरी बजावली. डॅरेल मिशेलने आपल्या खेळीत तीन चौकार मारले.

न्यूझीलंडच्या फलंदाजांना डावाच्या उत्तरार्धात धावांची गती वाढवता आली नाही. ग्लेन फिलिप्स याने 24 चेंडूंत 34 धावांची खेळी साकारली. पण टीम सेईफर्ट 13 धावा जेम्स निशाम 3 धावा यांच्याकडून निराशा झाली. मिशेल सॅण्टनरने नाबाद 8 धावांची व ॲडम मिल्नने नाबाद 5 धावांची खेळी केली. भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडला मोठी धावसंख्या उभारू दिलीनाही.

न्यूझीलंडकडून मिळालेल्या 154 धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताची सुरुवात दणदणीत झाली. रोहित शर्मा व लोकेश राहुल या सलामी जोडीने 117 धावांची खणखणीत भागीदारी करताना न्यूझीलंडच्या विजयाच्या आशांना सुरुंग लावला. दोघांच्या दे दणादण फटकेबाजीमुळे स्टेडियममध्ये उपस्थित क्रिकेटप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडले गेले. दोघांची जोडी टीम इंडियाला जिंकून देणार असे वाटत असतानाच टीम साऊथीच्या गोलंदाजीवर लोकेश राहुल 65 धावांवर ग्लेन फिलिप्सकरवी झेलबाद झाला. या खेळीत त्याने सहा चौकार व दोन षटकार मारले. रोहित शर्मा यानेही आपले अर्धशतक साजरे केले. त्याने 36 चेंडूंत एक चौकार व पाच षटकारांसह 55 धावांची खेळी साकारली. टीम साऊथीच्याच गोलंदाजीवर तो बाद झाला. टीम साऊथीनेच सूर्यकुमार यादवला एका धावेवरच बाद केले; पण व्यंकटेश अय्यर (नाबाद 12) व रिषभ पंत (नाबाद 12) यांनी अधिक पडझड होऊ न देता भारताचा विजय निश्‍चित केला.

आता या विजयामुळे भारतीय संघ न्यूझीलंडला या मालिकेत व्हाईट वॉश देईल का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोमंतकीय संस्कृतीने सजला IFFI 2024! आकाशकंदील स्पर्धा, शिगमा-कार्निव्हल परेडला भरघोस प्रतिसाद

महिलेच्या खासगी जागी बोट लावणे लैंगिक अत्याचार होत नाही; गोवास्थित मुंबई हायकोर्टाचा निर्णय, संशयिताला जामीन

Nagarjuna At IFFI: 'त्यांचे उद्दिष्ट होते की तेलुगु चित्रपट सृष्टीला दखल घेण्याजोगी..', नागार्जुनने जागवली वडिलांची हृदयस्पर्शी आठवण

Calangute Baga: उत्तर गोव्यातील प्रसिद्ध भाग दाखवला रेड लाईट एरिया; Youtuber ने हात जोडून मागितली माफी

Goa Today's News Live: कळंगुटमध्ये रस्त्यावर नग्न होऊन राडा करणाऱ्या UP च्या पर्यटकाला अटक

SCROLL FOR NEXT