IND vs NZ ODI LIVE Streaming Dainik Gomantak
क्रीडा

IND vs NZ ODI LIVE Streaming: मिशन न्यूझीलंड! रोहित- विराट मैदानात उतरणार! वनडे मालिकेचा थरार कधी आणि कुठे पाहाल लाईव्ह?

India vs New Zealand ODI Series 2026: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे क्रिकेट मालिकेची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

Sameer Amunekar

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे क्रिकेट मालिकेची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. या मालिकेत भारतीय संघातील अनेक अनुभवी खेळाडू मैदानात उतरणार असल्याने क्रिकेटप्रेमींना पुन्हा एकदा रोमहर्षक सामने पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे, टी-२० संघात स्थान न मिळालेल्या रोहित शर्मा आणि विराट कोहली यांसारख्या दिग्गज खेळाडूंचे वनडे संघात पुनरागमन होणार आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ न्यूझीलंडला आव्हान देणार आहे.

मात्र, मालिका सुरू होण्यापूर्वी चाहत्यांच्या मनात एक महत्त्वाचा प्रश्न आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामने कोणत्या टीव्ही चॅनेलवर पाहता येणार? या मालिकेचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार की चॅनेलमध्ये काही बदल करण्यात आला आहे? तसेच मोबाईलवर सामने पाहण्यासाठी कोणते अ‍ॅप वापरावे लागणार? जाणून घेऊया सामन्यांच्या प्रक्षेपणासंदर्भातील महत्त्वाची माहिती.

पहिला वनडे सामना कधी आणि कुठे होणार?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेला ४ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतील पहिला सामना न्यूझीलंडमधील ऑकलंड येथील ईडन पार्क मैदानावर खेळवला जाणार आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ या सामन्यात विजय मिळवून मालिकेची दमदार सुरुवात करण्याचा प्रयत्न करेल.

या मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल आणि शुभमन गिल यांसारखे प्रमुख खेळाडू मैदानात दिसणार आहेत. त्यामुळे पहिल्या सामन्यापासूनच क्रिकेट चाहत्यांचे लक्ष या मालिकेकडे लागले आहे.

कोणत्या टीव्ही चॅनेलवर पाहता येणार?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर करण्यात येणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना टीव्हीवर सामने पाहण्यासाठी सोनी स्पोर्ट्सची चॅनेल्स उपलब्ध असतील.

मालिकेतील पहिला सामना सोनी स्पोर्ट्स ३ या चॅनेलवर हिंदी भाषेत पाहता येणार आहे. याशिवाय सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या अन्य चॅनेल्सवर वेगवेगळ्या भाषांमध्येही सामन्यांचे प्रक्षेपण केले जाणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आपल्या आवडीनुसार भाषेची निवड करून सामन्यांचा आनंद घेता येईल.

मोबाईलवर LIVE सामना पाहण्यासाठी कोणते अ‍ॅप वापरावे?

ज्या क्रिकेट चाहत्यांना टीव्हीसमोर बसून सामना पाहणे शक्य नाही, त्यांच्यासाठीही ऑनलाइन प्रक्षेपणाची सुविधा उपलब्ध असेल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या वनडे मालिकेचे थेट प्रक्षेपण सोनी लिव्ह (Sony LIV) अ‍ॅपवर पाहता येणार आहे.

प्रेक्षकांना स्मार्टफोन किंवा अन्य समर्थित डिव्हाइसवर Sony LIV अ‍ॅपच्या माध्यमातून सामन्यांचा आनंद घेता येईल. तसेच सोनी लिव्हच्या अधिकृत वेबसाइटवरूनही लाईव्ह स्ट्रीमिंग पाहण्याची सुविधा उपलब्ध असेल. मात्र, ऑनलाइन सामना पाहण्यासाठी लागू असलेले सबस्क्रिप्शन किंवा प्लॅन तपासणे आवश्यक आहे.

पहिल्या तीन वनडे सामन्यांसाठी भारतीय संघ

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी भारतीय संघाची धुरा शुभमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. श्रेयस अय्यर उपकर्णधाराची जबाबदारी सांभाळणार आहे.

भारताचा संघ : शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, नमन धीर, अंशुल कंबोज, गुरनूर बराड, ऋतुराज गायकवाड, अर्शदीप सिंग, ईशान किशन (यष्टीरक्षक), मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी (केवळ पहिल्या वनडेसाठी) आणि औकिब नबी.

चौथ्या आणि पाचव्या वनडेसाठी संघात बदल

मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघात काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. या सामन्यांमध्ये श्रेयस अय्यरकडे कर्णधारपदाची जबाबदारी असेल. तर ईशान किशन उपकर्णधारपद सांभाळणार आहे.

भारताचा संघ : श्रेयस अय्यर (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, तिलक वर्मा, ईशान किशन (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), अक्षर पटेल, नमन धीर, औकिब नबी, गुरनूर बराड, ऋतुराज गायकवाड, अर्शदीप सिंग, कुमार कुशाग्र (यष्टीरक्षक), मोहम्मद सिराज, यश ठाकूर आणि कुलदीप यादव.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Cricketer Viral Chat: शर्टलेस फोटो अन् खासगी चॅट व्हायरल! टीम इंडियाचा खेळाडू चर्चेत; क्रिकेट विश्वात खळबळ

39 व्हिला, स्विमिंग पूलची परवानगी रद्द करा, तुये ग्रामसभेत मागणी; आयटी कन्व्हेन्शन सेंटर आणि कचरा प्रकल्पाला कडाडून विरोध

Karapur Sarvan Illegal Constructions: बेकायदा बांधकामांच्या मुद्द्यावरुन कारापूर-सर्वण पंचायतीची ग्रामसभा तापली, ग्रामस्थांच्या आरोपांमुळे गदारोळ

Marathi language: "मराठीला राजभाषा हा आमचा हक्क, भीक नाही!", प्राचार्य सुभाष वेलिंगकरांचा सावंत सरकारला स्पष्ट इशारा

सत्तेसाठी सारे, गावासाठी कोण? पंचांच्या अनुपस्थितीमुळे ग्रामस्थ संताप; बेतकी-खांडोळा पंचायतीच्या कारभारावर गंभीर सवाल

SCROLL FOR NEXT