श्रेयस संघात कर्णधार विराट कोहलीची (Virat Kohli) जागा घेणार असल्याचे कर्णधार अजिंक्य रहाणे (AJinkya Rahane) याने सांगितले आहे.  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs NZ: मुंबईच्या तडाखेबंद फलंदाजाची भारतीय कसोटी संघात ऐन्ट्री

पहिल्या कसोटी सामन्यातून मुंबईचा फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) पदार्पण करणार आहे. श्रेयस संघात कर्णधार विराट कोहलीची (Virat Kohli) जागा घेणार असल्याचे कर्णधार अजिंक्य रहाणे (AJinkya Rahane) याने सांगितले आहे.

दैनिक गोमन्तक

भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गुरुवारपासून (25 नोव्हेंबर) कानपूरमध्ये खेळवला जाणार आहे. सामन्याच्या एक दिवस आधी भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणे (AJinkya Rahane) याने पत्रकार परिषदेत एक मोठी घोषणा केली आहे. पहिल्या कसोटी सामन्यातून मुंबईचा फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) पदार्पण करणार असल्याचे त्याने सांगितले आहे. श्रेयस संघात कर्णधार विराट कोहलीची (Virat Kohli) जागा घेणार आहे. कोहलीला पहिल्या कसोटीसाठी विश्रांती देण्यात आली आहे.

“रहाणे म्हणाला, भारतीय संघ कसोटी चॅम्पियनशिपच्या (WTC) अंतिम फेरीतील न्यूझीलंड विरुध्द झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याचा मनसुब्याने मैदानात उतरणार आहे. मात्र, संघ 6 मोठ्या खेळाडूंशिवाय खेळणार आहे. या सामन्यात नियमित कर्णधार कोहलीसह रोहित शर्मा, केएल राहुल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत यांना विश्रांती देण्यात आली आहे. यापैकी विराट कोहली दुसऱ्या कसोटीत संघात परतणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Firing: सत्तरीतील पडोसे गावात पुन्हा गोळीबार! एकाला अटक, एअरगन आणि काडतुसे जप्त; वाळपई पोलिसांकडून पुढील तपास सुरु

PM Modi Goa Speech: "आयुष्याच्या प्रत्येक वळणावर गोव्याच्या भूमीने मला दिशा दिली", PM मोदी असं का म्हणाले? Watch Video

Goa Accident: मुळगावात दुचाकींची समोरासमोर धडक, दोन तरुणांचा मृत्यू; अपघाताची पोलिसांकडून चौकशी सुरु

''गोव्याने केवळ संस्कृतीच जपली नाहीतर...'', गोकर्ण पर्तगाळी मठाच्या योगदानाचे कौतुक करताना PM मोदींनी काढले गौरोद्गार VIDEO

India GDP Growth: भारताची अर्थव्यवस्था सुस्साट! दुसऱ्या तिमाहीत GDP वाढ 8.2 टक्क्यांनी मजबूत, आर्थिक विश्लेषकांचे चुकले अंदाज

SCROLL FOR NEXT