Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

IND vs NZ: भारताने जिंकला टॉस, 'या' खेळाडूला 4 वर्षांनंतर मिळाली संधी

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील दुसरा कसोटी सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे.

दैनिक गोमन्तक

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील दुसरा कसोटी सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मुसळधार पावसामुळे टॉसला उशीर झाला आहे. सामना सकाळी साडेनऊ वाजता सुरु होणार होता आणि नाणेफेक सकाळी नऊ वाजता सुरु होणार होती. परंतु पावसाने ना टॉस होऊ दिला ना सामना वेळेवर होऊ दिला. त्यामुळे सामन्याचे पहिले सत्रावर पावसाचे संकट निर्माण झाले. साडेअकरा वाजता नाणेफेकीला अडीच तास उशीर झाला. दोन्ही संघात अंतिम-11 मध्ये बदल करण्यात आले आहेत. भारतीय संघात (Indian team) तीन बदल करावे लागतील, तर न्यूझीलंडला एक बदल करावा लागेल. हे सर्व बदल दुखापतीमुळे होत आहेत.

भारताचे तीन मोठे खेळाडू - इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane), रवींद्र जडेजा यांना संघाबाहेर जावे लागले आहे. जयंत यादव आणि मोहम्मद सिराज यांना संघात स्थान मिळाले आहे. यासोबतच विराट कोहलीही या सामन्यातून पुनरागमन करत आहे. कानपूरमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात तो खेळला नव्हता. त्याच्या जागी रहाणेने संघाचे नेतृत्व केले होते. एक प्रकारे आज रहाणेची जागा कोहलीने घेतली आहे.

केन विल्यमसनला दुखापत

या सामन्यात न्यूझीलंडच्या कर्णधारपदाची जबाबदारी टॉम लॅथमकडे देण्यात आली आहे. केन विल्यमसनला (Kane Williamson) दुखापत झाल्यामुळे त्याला संघ व्यवस्थापनाने विश्रांती दिली आहे. त्याच्या जागी डॅरिल मिशेलला संधी मिळाली आहे. प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी सांगितले की, कानपूर कसोटीदरम्यान दुखापत पुन्हा झाली आणि ती अद्याप बरी झालेली नाही. त्यामुळेच त्याला संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

जयंत यादव चार वर्षांनी पुनरागमन करतोय

रवींद्र जडेजाच्या जागी अष्टपैलू जयंत यादव अंतिम-11 मध्ये संधी देण्यात आली आहे. जयंतने भारतासाठी चार कसोटी सामने खेळले आहेत. त्याने एक शतक आणि अर्धशतकासह 228 धावा करत 11 बळी घेतले आहेत. त्याने त्याचा शेवटचा कसोटी सामना फेब्रुवारी 2017 मध्ये पुण्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता.

भारत की प्लेइंग-11: मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कप्तान), श्रेयस अय्यर, ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, उमेश यादव, मोहम्मद सिराज।

न्यूजीलैंड की प्लेइंग-11: टॉम लाथम (कप्तान), विल यंग, डेरेल मिशेल, रॉस टेलर, हेनरी निकोल्स, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), रचिन रविंद्र, कायेल जेमीसन, टिम साउदी, विल सोमरविल, एजाज पटेल।

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT