Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND vs NZ: तिसऱ्या वनडेसाठी भारताची Playing 11 फिक्स! कर्णधार रोहित 'या' खेळाडूला देणार डच्चू?

India vs New Zealand: भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धचे पहिले दोन एकदिवसीय सामने जिंकून मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.

दैनिक गोमन्तक

India vs New Zealand 3rd ODI: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया शानदार फॉर्ममध्ये आहे. भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धचे पहिले दोन एकदिवसीय सामने जिंकून मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. तिसरा वनडे 24 जानेवारीला खेळवला जाईल. हा सामना जिंकून टीम इंडियाला मालिकेत क्लीन स्वीप करायचा आहे. यासाठी कर्णधार रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करु शकतो. त्याबद्दल जाणून घेऊया...

टॉप ऑर्डर कायम राहील

शुभमन गिलने गेल्या पाच सामन्यांमध्ये रोहित शर्मासोबत (Rohit Sharma) उत्कृष्ट सलामी भागीदारी केली आहे. रोहित आणि गिल शानदार फॉर्ममध्ये आहेत. अशा स्थितीत या दोन्ही खेळाडूंचे मैदानात उतरणे निश्चित दिसते. रोहितने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 51 धावांची तुफानी खेळी खेळली.

त्याचवेळी, स्टार फलंदाज विराट कोहलीचे (Virat Kohli) तिसऱ्या क्रमांकावर उतरणे निश्चित दिसते. कोहली हा एक मोठा मॅच विनर आहे.

या खेळाडूंना मधल्या फळीत स्थान मिळेल का?

ईशान किशन चौथ्या क्रमांकावर उतरणार हे निश्चित आहे. तो यष्टिरक्षणाची जबाबदारीही पार पाडताना दिसतो. त्याचबरोबर पाचव्या क्रमांकावर सूर्यकुमार यादवला संधी मिळू शकते. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सूर्याला अद्याप आपल्या नावाप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. अशा स्थितीत, तिसऱ्या वनडेत त्याला मोठी खेळी करायला आवडेल. त्याचवेळी हार्दिक पांड्याचे सहाव्या क्रमांकावर उतरणे निश्चित दिसते. हार्दिक बॉल आणि बॅटमध्ये उत्कृष्ट लयीत दिसत आहे.

या गोलंदाजांना संधी मिळू शकते

दुसऱ्या वनडेत भारतीय वेगवान गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली. मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनी डावाच्या सुरुवातीलाच किलर बॉलिंग केली आहे. त्याचबरोबर अष्टपैलू शार्दुल ठाकूरच्या जागी कर्णधार रोहित शर्मा उमरान मलिकला संधी देऊ शकतो. उमरान शानदार फॉर्ममध्ये असून वेग ही त्याची सर्वात मोठी ताकद आहे. कुलदीप यादवला फिरकीपटू म्हणून संधी मिळू शकते. त्याचबरोबर वॉशिंग्टन सुंदरला जागा मिळू शकते.

तिसऱ्या वनडेसाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, ईशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Teacher Recruitment: 'टीईटी'अभावी शिक्षक उमेदवारांची जाणार संधी, परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे 'प्रमाणपत्र' सादर करणे अनिवार्य

Illegal Spa Goa: मसाज पार्लरच्‍या नावाखाली कोलव्यात वेश्‍‍याव्‍यवसाय, दोन पार्लरवर छापे; 9 युवतींची सुटका

Mapusa Theft: म्हापशातील सशस्त्र दरोडा; दोन दिवस उलटले, अद्याप धागेदोरे नाहीत; पोलिसांची आठ पथके मागावर

PM Narendra Modi: काँग्रेसनेच लष्कराला हल्ल्यापासून रोखले, '26-11'बाबत पंतप्रधान मोदींची टीका

GDS Recruitment: डाकसेवक पदांसाठी 'कोकणी' अनिवार्य! मराठीतून शिकलेल्‍यांनाही बंधनकारक, मुख्‍यमंत्र्यांकडून निर्णयाचे स्‍वागत

SCROLL FOR NEXT