Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND vs NZ: दुसऱ्या वनडेत टीम इंडियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले 'हे' 5 धाकड

IND vs NZ 2nd ODI Match: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना रायपूर येथे खेळला गेला.

दैनिक गोमन्तक

IND vs NZ 2nd ODI Match: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना रायपूर येथे खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने 8 गडी राखून मालिका जिंकली. उभय संघांदरम्यान खेळल्या गेलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडचा संघ 108 धावांत गुंडाळला गेला, भारताने हे लक्ष्य केवळ 2 गडी गमावून पूर्ण केले. टीम इंडियाच्या या मोठ्या विजयात 5 खेळाडू सर्वात मोठे हिरो ठरले.

दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या (New Zealand) मालिकेतील दुसऱ्या सामन्यात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी भारतीय संघाच्या विजयाचा सर्वात मोठा हिरो ठरला. या सामन्यात 6 षटके टाकताना मोहम्मद शमीने अवघ्या 3.00 च्या इकॉनॉमीसह 18 धावा दिल्या आणि 3 महत्त्वाच्या खेळाडूंना बाद केले.

दुसरीकडे, टीम इंडियाचा (Team India) अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यानेही या सामन्यात अप्रतिम कामगिरी केली. हार्दिकने या सामन्यात 6 षटके टाकताना केवळ 16 धावा दिल्या आणि 2 विकेट्स आपल्या नावावर केल्या.

तसेच, वॉशिंग्टन सुंदरलाही या मालिकेत मिळत असलेल्या संधींचा पुरेपूर फायदा उठवता आला आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वॉशिंग्टन सुंदरने फक्त 3 षटके टाकली, परंतु या छोट्या षटकातही तो 2 विकेट घेण्यात यशस्वी झाला. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचा घातक फॉर्म या सामन्यातही कायम राहिला. या सामन्यात 6 षटके टाकताना मोहम्मद सिराजने 1.66 च्या इकॉनॉमीसह केवळ 10 धावा दिल्या आणि 1 बळी घेतला.

शिवाय, 109 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने कर्णधारपदाची खेळी खेळली. रोहित शर्माने 50 चेंडूंचा सामना करत 51 धावा केल्या, या इनिंगमध्ये रोहित शर्माच्या बॅटला 7 चौकार आणि 2 षटकार लागले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

SCROLL FOR NEXT