Ravindra Jadeja Dainik Gomantak
क्रीडा

IND Vs ENG: जड्डूने रचला इतिहास, कपिल देव अन् माहीच्या स्पेशल क्लबमध्ये सामील

बर्मिंगहॅममध्ये खेळल्या जात असलेल्या पाचव्या कसोटीत रवींद्र जडेजाने इतिहास रचला आहे.

दैनिक गोमन्तक

Ravindra Jadeja: भारत आणि इंग्लंड यांच्यातील एजबॅस्टन, बर्मिंगहॅममध्ये खेळल्या जात असलेल्या पाचव्या कसोटीत रवींद्र जडेजाने इतिहास रचला आहे. जडेजाने 194 चेंडूंत 13 चौकारांच्या मदतीने 104 धावांची शानदार खेळी खेळली. यासह, तो कपिल देव आणि एमएस धोनीच्या खास लिस्टमध्ये सामील झाला आहे.

जडेजा या खास क्लबमध्ये सामील झाला

एका कॅलेंडर वर्षात सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना जडेजाने दोन शतके झळकावली आहेत. यासोबतच तो महान क्रिकेटपटू कपिल देव आणि एमएस धोनी यांच्या स्पेशल क्लबमध्येही सामील झाला आहे.

कपिल देव: 1986

एमएस धोनी: 2009

हरभजन सिंग: 2010

रवींद्र जडेजा: 2022*

असे करणारा चौथा भारतीय

एजबॅस्टन, बर्मिंगहॅममध्ये शतक झळकावणारा रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) चौथा भारतीय ठरला आहे. त्याच्या आधी याच सामन्यात ऋषभ पंत, सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनी एजबॅस्टनमध्ये कसोटी शतके झळकावली आहेत. जडेजाने 183 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. यादरम्यान त्याने 13 चौकार मारले. पहिल्या दिवशी ऋषभ पंतने 89 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. जडेजाने 194 चेंडूत 104 धावांची खेळी खेळली.

जडेजाने कारकिर्दीतील तिसरे शतक झळकावले

रवींद्र जडेजाचे हे कसोटी क्रिकेटमधील तिसरे शतक आहे. कसोटी क्रिकेटमधील नंबर वन अष्टपैलू खेळाडूच्या नावावर आता 36.76 च्या सरासरीने 2500 धावा झाल्या आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला त्याने 175 धावांची शानदार खेळी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

Durand Cup: 'ड्युरँड कप' होणार गोव्याशिवाय! गोमंतकीय संघांची नोंदणी नाही; संघ बांधणी प्रक्रिया पूर्ण नाही

Anmod Ghat: अनमोड घाटातील रस्ता खचला; बेळगाव - गोवा मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Pissurlem: चिंता मिटली! पिसुर्लेत खाण खंदकावर पंप तैनात; धोक्याची पातळी ओलांडल्यास होणार उपसा

Goa News Live Updates: मुसळधार पावसाचा फटका; पणजी, ताळगाव, सांताक्रूझ आणि सांत आंद्रे परिसरात मर्यादीत पाणी पुरवठा

SCROLL FOR NEXT