T20 World Cup: T20 विश्वचषक 2022 च्या उपांत्य फेरीतील सामन्यात टीम इंडियाला 10 विकेट्सनी पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात टीम इंडिया पूर्णपणे फ्लॉप ठरली. इंग्लंडने या सामन्यात टीम इंडियाचा 10 गडी राखून पराभव केला. भारताच्या या दणदणीत पराभवामागे 5 खेळाडूंचा मोठा हात आहे. हे पाच खेळाडू पूर्णपणे फ्लॉप ठरले.
दरम्यान, टी20 विश्वचषक 2022 च्या या मोठ्या सामन्यात सलामीवीर केएल राहुल पूर्णपणे फ्लॉप ठरला. केएल राहुलने इंग्लंडविरुद्ध अवघ्या 5 धावा केल्या. संघाला चांगली सुरुवात करुन देण्यात तो पुन्हा एकदा अपयशी ठरला.
तसेच, टीम इंडियाच्या या पराभवाचा भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) दुसरा सर्वात मोठा खलनायक ठरला. भुवनेश्वर कुमार सुरुवातीच्या षटकात विकेट घेण्यासाठी ओळखला जातो, परंतु या सामन्यात त्याने 2 षटकात 25 धावा दिल्या. मात्र त्याला एकही विकेट मिळवता आली नाही.
दुसरीकडे, T20 विश्वचषक 2022 मध्ये टीम इंडियाकडून (Team India) सर्वाधिक विकेट घेणारा अर्शदीप सिंग या सामन्यात एकही विकेट घेऊ शकला नाही. अर्शदीपने 2 षटकात 15 धावा दिल्या, मात्र विकेट घेण्यात अपयशी ठरला. अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमीलाही इंग्लंडविरुद्ध विकेट घेता आली नाही. मोहम्मद शमीने 13.00 च्या इकॉनॉमीमध्ये 3 षटकात 39 धावा दिल्या. या सामन्यात मोहम्मद शमी हा दुसरा सर्वात महागडा गोलंदाज ठरला.
शिवाय, टीम इंडियाचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनलाही (Ravichandran Ashwin) एकही विकेट मिळवता आली नाही. रविचंद्रन अश्विन हा मधल्या षटकांमध्ये विकेट घेण्यासाठी ओळखला जातो. या सामन्यात अश्विनने 2 षटकात 27 धावा दिल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.