Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND vs ENG T20: दुसऱ्या T20 मध्ये वर्णद्वेषाचा सामना करण्यासाठी बनवली खास योजना

दैनिक गोमन्तक

Ind Vs Eng: भारत आणि इंग्लंड यांच्यात नुकत्याच पार पडलेल्या पाचव्या कसोटी सामन्यादरम्यान प्रेक्षकांवर जातीय भेदभाव केल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर एजबॅस्टनमध्ये उभय संघांमधील दुसऱ्या T20 दरम्यान वॉरविक्शायर 'अंडरकव्हर स्पॉटर्स' तैनात करणार आहे. काउंटीने गुरुवारी ही घोषणा केली. भारताच्या अनेक समर्थकांनी पाचव्या कसोटीदरम्यान इतर चाहत्यांवर वांशिक दुर्वव्यवहाराचा आरोप केला होता. इंग्लंडने ही कसोटी सात विकेटने जिंकून मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली आहे.

दरम्यान, "फुटबॉलच्या विपरीत, गैरवर्तनाचा मागोवा घेऊन त्वरित कारवाईसाठी संपूर्ण स्टेडियममध्ये (Stadium) अंडरकव्हर स्पॉटर्स तैनात केले जातील," असे क्लबने एका निवेदनात म्हटले आहे. वॉरविकशायरने वर्णद्वेषाचा सामना करण्यासाठी अनेक पावले उचलण्याची घोषणा केली आहे. वॉरविकशायरचे मुख्यालय एजबॅस्टनमध्ये आहे.

दुसरीकडे, कोणत्याही घटनेला सामोरे जाण्यासाठी पोलिसांची (Police) उपस्थिती वाढवणे, एजबॅस्टन मोबाइल अ‍ॅपद्वारे वर्णद्वेषाबद्दल जागरुकता निर्माण करणे, चाहत्यांना या अ‍ॅपशी जोडण्यात मदत करण्यासाठी एरिक हॉलिस स्टँडवरील प्रत्येक सीटवर 'क्यूआर' कोड स्टिकर्स लावणे समाविष्ट आहे.

क्लबने म्हटले आहे की, 'आम्ही कोणत्याही प्रकारच्या वर्णद्वेषी गैरवर्तनाचा जाहीर निषेध करतो. वर्णद्वेषाच्या गुन्ह्यात दोषी आढळल्यास एजबॅस्टनमध्ये येण्यास बंदी घातली जाईल. त्याचबरोबर इंग्लंड (England) आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) सर्व अधिकारक्षेत्रातून बंदी घालेल.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT