Ind vs Eng Dainik Gomantak
क्रीडा

Ind vs Eng: अंपायर आणि गोलंदाजामध्ये वाद; व्हिडिओ व्हायरल

व्हिडिओमध्ये अंपायर रिचर्ड केटलबरो आणि वेगवान गोलंदाज यांच्यात जोरदार वाद होत आहे.

दैनिक गोमन्तक

एजबॅस्टन कसोटीचा शेवटचा दिवस दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. टीम इंडियाची नजर मालिका विजयावर असणार आहे, तर दुसरीकडे इंग्लंड मालिकेत बरोबरी करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. या सगळ्या दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अंपायर रिचर्ड केटलबरो आणि वेगवान गोलंदाज यांच्यात जोरदार वाद होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा आहे. इंग्लंडच्या पहिल्या डावात सॅम बिलिंग्ज आणि स्टुअर्ट ब्रॉड फलंदाजी करत होते. त्यानंतर स्टुअर्ट ब्रॉड पंच रिचर्ड केटलबरो यांच्यावर नाराज झाला आणि दोघांमध्ये वाद सुरू झाला.

स्टुअर्ट ब्रॉडसाठी हा सामना काही खास ठरला नाही. या सामन्यात त्याला केवळ 3 विकेट मिळाल्या. त्याचबरोबर या सामन्यात त्याने गोलंदाज म्हणून एक लाजिरवाणा विक्रमही केला. सामन्याच्या पहिल्या डावात टीम इंडियाचा कर्णधार जसप्रीत बुमराहने स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात 35 धावा दिल्या. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हे सर्वात मोठे षटक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT