भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील तिसरा कसोटी सामना बुधवारपासून लीड्समध्ये सुरु होत असून या सामन्यापूर्वीच पुन्हा एकदा अँडरसन आणि बुमराह (Bumrah) यांच्यात पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. खरं तर, लीड्स कसोटीपूर्वी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने (James Anderson) जसप्रीत बुमराहच्या विरोधात वक्तव्य केले आहे, ज्यामध्ये त्याने आरोप केला आहे की, भारतीय वेगवान गोलंदाजानी त्याला जाणीवपूर्वक बाऊन्सर टाकले जेणेकरुन मला त्यांना आऊट करायचे नव्हते.
आता लीड्स कसोटीपूर्वी, टेलिनडर्स पॉडकास्टशी बोलताना अँडरसनने बुमराहवर आरोप केला आहे. तसेच, त्याच्या वक्तव्यावरुन असे वाटते की, तो अजूनही आतून घाबरलेला आहे. अँडरसन म्हणाला, 'येणारा कोणताही फलंदाज खेळपट्टी संथ असल्याचे सांगत होता. कर्णधार रुटने मला असेही सांगितले की, बुमराह त्याच्याइतकी वेगवान गोलंदाजी करत नाही. माझ्या संपूर्ण कारकिर्दीत मला असे कधीच वाटले नाही. तो मला आऊट करण्याचा प्रयत्न करत नव्हता.'
बुमराहने एका षटकात 4 नो बॉल टाकले
बुमराहने त्या षटकात 4 नो बॉल टाकले होते. ज्यावर अँडरसन म्हणाला, 'मला वाटले बुमराह मला आऊट करण्याचा प्रयत्न करत नव्हता. त्याने एका षटकात 10, 11, 12 चेंडू टाकले. तो नो बॉलवर नो बॉल टाकत होता आणि सतत बाऊन्सर मारत होता. मला आठवते की त्याने स्टंपवर फक्त दोन चेंडू टाकले ज्याचा सामना मी करु शकलो. मी फक्त माझी विकेट वाचवण्याचा प्रयत्न करत होतो जेणेकरुन जो रुट स्ट्राईकवर येऊ शकेल. तसेच, मोहम्मद शमीने जेम्स अँडरसनची विकेट घेतली आणि त्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतताना तो बुमराहला आक्रमक पद्धतीने काहीतरी बोलताना दिसला. मात्र, अँडरसनच्या आक्रमकतेमुळे इंग्लंडच्या संघाचा एक तोटा झाला की, भारताने लॉर्ड्स कसोटी 151 धावांनी जिंकली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.